Novel Cover Image

Practice

User Avatar

Nehal

Comments

0

Views

22

Ratings

0

Read Now

Description

ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r...

Total Chapters (7)

Page 1 of 1

  • 1. Practice - Chapter 1

    Words: 2033

    Estimated Reading Time: 13 min

    Chapter 2 :-
    नदीची कहाणी....

    त्याचं बोलणं ऐकून रामचंद्र म्हणतात : " कारण त्या नदीचं पाणी कोणीही वापरू शकत नाही."

    हे एकूण आरव विचारतो : " असे का आजोबा? "

    तर रामचंद्र उत्तर देतात : " बाळा ही नदी श्रापीत आहे. माझ्यासाठी ही नदी आमच्या बालपणाची सुवर्ण आठवण आहे. पण काय माहिती कोणाची नजर लागली गोवर्धन वाडीला.... जाऊद्या तुम्ही आता आता अलात. यात लक्ष देऊ नका. "

    हे एकूण आरव विचारतो : " आजोबा तुम्ही म्हटलं की हे नदी तुमच्या बालपणाची सुवर्ण आठवण आहे तर मग हे शापित कशी झाली? सांगा ना आजोबा, तुम्ही लहानपणी म्हटलं होत जेव्हा मी मोठा होईल तेव्हा तुम्ही मला सांगणार."

    हे ऐकून रामचंद्र एक दीर्घ श्वास घेतात व तिघांकडे बघत म्हणतात : " ही गोष्ट 28 वर्षांपूर्वीची आहे. त्याकाळी गोवर्धन वाडीत पाण्याची समस्या नव्हती. ती नदी म्हणजे गोवर्धन वाढीचा शृंगार होती. आजूबाजूच्या गावातले लोक गोवर्धन वाडीला एक समृद्ध आणि संपन्न गाव म्हणून ओळखत असत. जिकडे नजर फिरल तिकडे हिरवीगार शेती होती. "

    त्यांचे बोलणं ऐकत ते तिघे एकमेकांकडे पाहू लागले. रामचंद्र त्या आठवणीत विसरून म्हणत होते : " गावातल्या बायका आनंदाने नदीतून पाणी काढत असत. लहान मुले त्या नदीकाठी दिवसभर खेळ खेळायची. जी पंचायत आता जुन्या वड्याच्या झाडाखाली लागते. ती कधी नदीच्या बाजूला असलेल्या वड्याच्या झाडाखाली लागायची. ती नदी या गावातल्या लोकांसाठी मातेसमान होती. "

    त्यांचं बोलणं ऐकून आरव आपल्या चेहऱ्यावर आश्चर्य घेऊन म्हणतो : " आजोबा, जर ती नदी इतकीच महत्त्वाची होती तर आता कोणी त्यातून पाणी का काढत नाही? आणि ज्या नदीला गावातले लोक माते समान मानत होते. आज तिला शापित का मानतात?"

    हे ऐकून रामचंद्र ने त्यांचे डोळे मिटले. असं वाटत होतं ते त्या दिवसांच्या आठवणीत पुन्हा मिसळून गेले आहेत. रामचंद्र आपले डोळे उघडून म्हणतात : " माझ्या डोक्यातून त्या आठवणी काढून टाकाव्याशा वाटतात. पण माणूस म्हणून जन्मल्यावर अशा गोड कडू आठवणी तर मरेपर्यंत सोबत ठेवावेच लागतात. मला आजही आठवतं सोमवारचा दिवस होता तो. गावातली एक बाई पाणी भरायला नदीकाठी गेली होती. ती पाणी भरून घरी परतली. ज्यांनी ज्यांनी ते पाणी पेलं त्या सर्वांचा मृत्यू झाला. "

    हे ऐकून आरव, करण आणि विशाल आश्चर्याने रामचंद्रला पाहू लागले. रामचंद्र त्यांच्या आश्चर्याची जाणीव ठेवून म्हणाले : " त्या परिवार मध्ये आठ जण होते. सासू, सासरे, ती बाई, तिचा नवरा, तिचा दीर, तिची जाऊ, आणि तिचे दोन लेकरं. गावातल्यांना आणखी कळालं नव्हतं की नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला."

    तर करण विचारतो : " मग तुम्ही डॉक्टरला बोलावलं नव्हतं का?"

    तर रामचंद्र उत्तर देत म्हणतात : " बोलवलं होतं. जमीनदार चा एक नातेवाईक डॉक्टर होता. तोच आला होता त्यांना बघायला."

    मग विशाल विचारतो : " त्यांनी काय म्हटलं मग?"

    यावर रामचंद्र उत्तर देत म्हणतात : " डॉक्टरांनाही काही समजलं नाही की त्या सर्वांचा मृत्यू कसा झाला होता. आजही त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आश्चर्याचा भाव आठवतो मला."

    आरव विचारतो : " मग कोणाला समजलं की या सर्वांचा मृत्यू नदीतलं पाणी पिऊन झाला आहे? आणि जर डॉक्टरांनाही समजलं नव्हतं की त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे. तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांचा मृत्यू नदीतलं पाणी पिऊन झालं होतं? त्यांच्या मृत्यूचे कारण काही दुसरेही असू शकत?"

    हे ऐकून रामचंद्र थोडे हसत म्हणतात : " तुम्हा तरुण पिढीला आमच्यावर रेशमात्र ही विश्वास नसतो ना? जाऊद्या, तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहेत माझ्या जवळ. त्यांच्या मृत्यूची बातमी गावभर पसरली होती तितक्यातच एक बाई नदीकाठी धुणं धुवायला गेली होती. पाण्यात उतरताच तिचा मृत्यू झाला. थोड्यावेळाने गाव वाल्यांना तिचा शव भेटला."

    हे एकूण विशाल विचारतो : " पण असेही होऊ शकतं ना की धुणं धुवायला पाण्यात जाताना तिचा पाय घसरला असावा आणि तिचा तोल न सावरता ती पाण्यात पडून बुडून मेली असेल?"

    हे ऐकून रामचंद्रच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागतं. रामचंद्र म्हणतात : " त्या बाईला ज्या माणसाने पाण्यातून काढलं होतं. एक दिवसाच्या आत त्या माणसाचा ही मृत्यू झाला. नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ते पाणी त्यांच्या शेतात वापरलं त्यांचं पीक जळून गेलं ( पीक खराब झाले )."

    हे ऐकून करण म्हणतो : " पण पिक तर जास्त पाण्याच्या वापराने ही खराब होऊ शकतं ना? आणि पीक खराब होण्याचे दुसरे भरपूर कारण असू शकतात."

    तर रामचंद्र म्हणतात : " बाळा तू शहरातून आला आहेस तरीही तुला शेता बद्दल माहिती आहे. मग हे तर वर्षं वर्षी शेतात राबणारे शेतकरी आहेत. यांना त्या पिकाबद्दल किती माहिती असेल. तुझं म्हणणं तर असंच झालं ना की सोनाराला सोन्यात आणि पितळामध्ये अंतर समजत नाही. मला माहित आहे बाळांनो तुम्ही शहरातून आले आहात. तुमचे विज्ञान अशा गोष्टींना सत्य मानत नाही, पण आशा खूप गोष्टी आहेत. ज्याला विज्ञानही अन आयडेंटिफाइड अननोन म्हणतो. विज्ञान माणसाने बनवले आहे माणूस विज्ञानाने नाही. "

    रामचंद्र च बोलन ते तिघेही लक्ष देऊन ऐकत होते. रामचंद्र : " तुम्ही तरुण आहात. तुमची बुद्धी चंचळ आहे. तुम्हाला नवीन गोष्टी जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असते. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न करणे हा तुमचा गुणधर्म आहे. प्रश्न करणे चांगली गोष्ट असते. पण कधी कधी मोठ्यांचं ऐकणंही महत्त्वाचं असतं. जाऊद्या, आपण आपल्या विषयाकडे येऊ. तुम्ही म्हणालात पीक जास्त पाण्यामुळे ही खराब होऊ शकतं. हो पीक जास्त पाणी घातल्यामुळे ही खराब होतं. पण ही गोष्ट शेतकऱ्यांनाही माहिती असते. शेतकरी शेतात तितकच पाणी घालतात जितकं गरजेचं असतं. "

    त्यांचं बोलणं ऐकून करण होकारामध्ये आपली मान हलवतो. त्याचा होकार ऐकून रामचंद्र चा चेहऱ्यावर समजूतदारपणाची स्माईल येते.

    रामचंद्र पुन्हा गंभीर भावाने म्हणतात : " हळूहळू गावातले सर्व पीक खराब होऊन गेलं. ज्या ज्या माणसाने ते पाणी पिल त्यांचा मृत्यू झाला. मग या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन गावातला सरपंचाने ही नदी बंद करायचा विचार गावासमोर मांडला. गावकऱ्यांनाही हे मान्य झालं की ती नदी शापित झाली आहे. मग सर्वांनी मिळून ती नदी अडवली."

    आरव विचार करत म्हणतो : " सरपंचांनी नदी बंद करायचा विकल्प दिला होता ना. यात त्यांचा तर काही हात नव्हे?"

    हे ऐकून रामचंद्र आपलं डोकं नकाराने हालवत म्हणतात : " तुमचं काही होऊ शकत नाही. यात सरपंचाचा काहीही हात नव्हता, कारण त्यांच्या पत्नीचाही मृत्यू संध्याकाळी त्या नदीच पाणी भरायला गेल्यावरच झाला होता."

    यावर करण म्हणतो : " मग जमीनदाराचा असेल. अशा गोष्टी मागे जमीनदारच असतो. मी खूप पिक्चर मध्ये पाहिला आहे."

    करण ने ही गोष्ट अशा पद्धतीने म्हटली होती की त्याचं बोलणं ऐकून त्या चौघांनाही हसू येत. रामचंद्र हसतच म्हणतात : " नाही यात जमीनदाराचा ही काही हात नव्हता. त्यांच्या तरुण मुलीचा मृत्यू ही त्या नदीतलं पाणी पिल्यामुळे झाला होता. आता तुम्हीच विचार करा. जर त्यांनी काही केलं असतं. तर त्यांच्या घरच्यांचा मृत्यू का झाला असता?"

    त्यांचे बोलणं ऐकून ते तिघे ही शांत होतात कारण रामचंद्र ची गोष्ट सत्य होती. जर त्यांनी काही केलं असतं तर त्यांच्या घरातला कोणाचाही मृत्यू झाला नसता. तेव्हा विशाल विचारतो : " आजोबा, आपण एखाद्या गोष्टीला शापित तेव्हा म्हणतो ना जेव्हा तिला शाप भेटला असेल मग या नदीला दूषित न म्हणता शापित का म्हणत आहेत."

    हे ऐकून रामचंद्रच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे गंभीर होतात. रामचंद्र त्यांचे डोळे चोरत म्हणतात : " बाळा ज्या नदीमुळे इतक्या लोकांचा मृत्यू झाला. त्या नदीला लोक शापितच म्हणणार ना? चला आता बस झालं तुम्ही खूप लांबून प्रवास करून आला आहात. जावा थोडी विश्रांती घ्या. उद्या गावामध्ये जत्रा लागणार आहे. वर्षभरात हा जत्राचाच दिवस असतो जेव्हा गोवर्धन वाडीत निराशा नसून आनंदाचे वातावरण असते. गावात येऊन जर जत्रा पाहिली नाही, तर काहीच पाहिलं नाही. उद्या ईशानी तुम्हाला जत्रेत घेऊन जाईल."

    मग आरव म्हणतो : " आजोबा, मी विचार करत होतो. आता जाऊन गाव फिरून यावे. विशालने पहिले कधीही गाव पाहिलं नाही."

    यावर रामचंद्र म्हणतात : " चांगला विचार आहे पण आता नका जाऊ... आता दुपार आहे. ऊन कडकडून पडत आहे. संध्याकाळी शिराळ पडली की, मग गावात फेरफटका मारून या."

    ते तिघे ही आरवच्या खोलीत येतात. आरवच्या खोलीत आल्याबरोबरच करण आणि विशाल जोरजोराने हसू लागतात. करण हसतच म्हणतो : " चिकू.. आरव तू आम्हाला कधी सांगितलं नाहीस की तुझं नाव चिकू पण आहे. "

    हे ऐकून आरव पलंगावरची एक उशी करण वर फेकत म्हणतो : " तुला खूप हसू येत आहे. मी विशाल ला सांगू का शिल्पा तुला काय म्हणायची?"

    विशालच्या डोळ्यात चमक येते तो आरव कडे पाहून म्हणतो : " हो सांग ना आरव, मलाही ऐकायचे आहे."

    करण त्याचे डोळे मोठे करून आरवला म्हणतो : " आरव विचारही नको करू. "

    आरव हसत करणला पाहून म्हणतो : " का आता काय झालं आता हसू येत नाहीये का तुला?"

    त्या तिघांच्या गप्पा अशाच चालू असतात. बघता बघता संध्याकाळ होते. जसे त्या तिघांचे ठरलं होतं ते तिघेही गावात फिरायला निघून जातात. ते गावभर फिरत असताना आरवला ओळखणारे माणसं थांबून त्याच्याशी बोलत होते. आरवला प्रश्न करत होते, की तू कुठे राहतो? काय शिक्षण घेत आहेस? व नदीकाठी न जाण्याची हिदायत ही देत होते.

    इतक्या लोकांकडून नदीकाठी जाऊ नका ऐकल्यानंतर त्या तिघांच्या मनातही नदीकाठी जाण्याची तीव्र उत्सुकता निर्माण होते. पण विशालला भीतीही वाटत होती. जेव्हा करण आणि आरव नदीकाठी जायचे ठरवतात तेव्हा विशाल घाबरत म्हणतो : " अरे नको ना.. काय माहिती खरंच ती नदी शापित असेल तर? आणि मी तर ऐकले आहे ज्या लोकांचा मृत्यू अचानक होतो त्यांची आत्मा भटकत असते काय माहिती ती सरपंचाची बायको आणि त्या बाईच्या आत्मा तिथे भटकत असेल तर?"

    यावर करण हसत म्हणतो : " विशाल तू 21 व्या शतकामध्ये देखील भूतांवर विश्वास ठेवत आहेस? मला तर अजूनही वाटत आहे. ती नदी शापित नाही यामागे लोकांचाच हात आहे."

    विशाल घाबरतच म्हणतो : " ते मला नाही माहित. पण मी स्वतः माझी मृत्यू ओढण्यासाठी नदीकाठी नाही जाणार."

    हे ऐकून करण आणि आरव त्याचा हात पकडून त्याला वडत घेऊन जाताना, करण म्हणतो : " चल रे काही नाही होणार. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. "

    विशाल रागात म्हणतो : " हो मला माहित आहे किती आहात तुम्ही सोबत. जर कोणतं भूत आलं तर तुम्ही मला त्याच्या समोर फेकून पळून जाणार."

    हे ऐकून करण आणि आरवला हसू येऊ लागत. पण ते आपलं हसू लपवतात कारण जर ते दोघे आता हसले असते, तर विशाल त्यांच्यासोबत जायला तयार झाला नसता.

    ते तिघेही नदीकाठी येतात. नदीच्या दोन्ही बाजूने लाकडे लावले होते. जेणेकरून कोणीही नदी जवळ जाऊ शकणार नाही. त्या नदीच्या जवळचा परिसर शांत होता. असं वाटत होते की त्या नदीच्या परिसरात देखील कोण आले तर त्याला ह्या नदीचा श्राप लागेल.

    ती जागा इतकी रम्य दिसत होती, की कोणाच्याही मनावरचे भार इथे येऊन हलके होऊ शकतात. आरव त्या जागेला आपल्या नजरेत भरून घेत होता का मग त्या जागेची पडताळणी करत होता? हे त्याचे त्यालाच माहीत होते. विशाल आपल्या घाबरलेल्या मनाने आणि डोळ्याने ती जागा पाहत होता. पण त्याचे लक्ष जास्त करून तर तिच्या मनात चालू असलेल्या मंत्र जपावर होते.

    करण देखील तिथल्या रम्य वातावरणाचा आस्वाद घेत होता.

    त्या नदीच्या दुसरा बाजूने दोन मुली झाडातून बाहेर येत होत्या. त्यातली एक मुलगी घाबरून म्हणते : " वाणी काय करत आहे तू? माझे ऐक आपण नको जायला तिथे. जर गावात कोणाला कळलं ना की आपण नदी पहायला गेलो होतो. तर आपल्याला खूप ओरडा खावा लागेल."

    हे एकूण वाणी तिला रागात पाहत म्हणाली : " किर्ती तू गावातल्या लोकांची इतकी का काळजी करत आहेस? कोणाला काहीही कळणार नाही. फक्त एकदाच तर मला ती नदी पाहून यायची आहे."

    यावर किर्ती नकाराने मान हलवत म्हणाली : " हे पुणे नाहीये. गाव आहे. इथे एक कानाची गोष्ट दुसऱ्या कानाला कळायला फार वेळ लागत नाही. आणि तुला काय तुझे आई वडील वाचवतील. पण माझा काही तरी विचार कर? हे बघ, उद्या आपण जत्रेत जाणारच आहोत ना. मग तेव्हा बघ ना तू तुला जे पाहिचे आहे ते."

    किर्तीच बोलणे ऐकून वाणी तिला तीक्ष्ण नजरेने पहात म्हणाली : " मी म्हंटल ना. आपण आताच जातोय. मग आता एकही शब्द काढायचा नाही तोंडातून. गप चल."

    हे म्हणत वाणी कीर्तीचा हात पकडून दिला नदी काठी घेऊन आली. नदीकाठीच्या रम्य वातावरणाला पाहून वाणीला मोकळ वाटू लागलं. शहरातून आलेल्या मुलीकडे पाहताना गावातल्यांच्या ज्या तीक्ष्ण नजरा असतात. वाणीला त्या नजरेतून लांब आल्या सारखं वाटू लागलं.

    खुपदा जीवनात माणसाला एक अशी जागा हवी असते. जिथे कोणी त्याला जेज करणार नाही. आणि सध्या वाणीसाठी ती जागा ही होती. वाणी डोळे मिटून आकाशाकडे चेहरा करून आपल्या हाताला पसरवले होते.

    नदीच्या दुसरा काठी आरव जो आशयाचं पोझिशन मधे होता. त्यांनी आपले डोळे उघडले. व नदी कडे पाहू लागला. तेवढ्यात तिची नजर दुसऱ्या बाजूला थांबलेल्या दोन मुलीनवर गेली. त्या मुली तिच्यापासून बऱ्याच अंतरावर होत्या. त्यामुळे तो त्या दोघींचेही चेहरे पाहू शकला नाही पण त्यांच्या कपड्यावरून त्याला हे समजले की त्या दोन मुली आहेत.

    संध्याकाळ हळूहळू रात्र मध्ये बदलत होती. जसा जसा सूर्य मावळून अंधार येत होता तसे तसे विशालची भीती वाढत होती. थोड्यावेळाने त्या दोन्ही मुली तिथून निघून गेला. मग हे तिघेही निघायला तयार झाले. आरव तिथून आपला पाय पुढे घेणारच होता की त्याच्या कानामध्ये एक विचित्र आवाज पडला. नकळत आरव मागे फिरला. तो एक पाऊल वाढवत नदीकडे जाऊ लागला. हे पाहून करण आणि विशाल अचंबित राहिले. विशाल आरवला पुन्हा पुन्हा आवाज देत होता पण जसे आरवला त्याचा आवाज ऐकूच येत नव्हता.

    तो कोणाच्यातरी वश मध्ये झाल्यासारखा नदीकडे जात होता. बघता बघता आरव त्या लाकडांना बाजूला करून त्या नदीच्या जवळ गेला.

    ही नदी खरच श्रापीत आहे का?
    रामचंद्र काही लपवत आहेत का?
    रामचंद्र ने सांगितलेली गोष्ट पूर्ण सत्य आहे का?

  • 2. Practice - Chapter 2

    Words: 1962

    Estimated Reading Time: 12 min

    Chapter 3:-

    पहिली भेट..

    आरव नदीत उतरणारच होता. की तेव्हाच करण तिथे येऊन त्याचा कांद्यावर हात ठेवतो. विशाल पण करण सोबतच होता. विशाल घाबरत आरवला विचारतो : " आरव, तुला काय होत आहे? मी म्हणालो होतो की आपण इकडे यायला नको. पण तुम्ही दोघे माझे काहीच ऐकत नाही."

    तेवढ्यातच आरव जोर जोरात हसू लागतो. हे पाहून विशालची भीती आणखी जास्त वाढते. करणला आरव चा prank समजतो व तो ही हसू लागतो. हे पाहून विशालची भीती आणखी वाढते. तो घाबरत म्हणतो : " काय झाले आहे तुम्हा दोघांना? मुर्खा सारखे हसत का आहात? "

    हे एकूण करण हसतच म्हणतो : " कारण तू एक नंबरचा भित्रा आहेस. अरे आरव तुझी मज्या घेत होता."

    हे ऐकून विशाल रागात येतो. तो रागामध्ये तिथून घरला जाताना म्हणतो : " माझीच चूक आहे जे मी तुमच्या सोबत आलो. "

    आरव आणि करण दोघे त्याच्या कांद्यावर हात ठेवतात. आरव त्याचे हसू थांबवत म्हणतात : " अरे माझ्या बाळा. इतक्या लवकर रुसू नये."

    आरव च बोलण विशाल च्या रागात तेल ओतल्यासारखे होते. ते तिघे तिथून जातच होते. की त्यांची नजर एका मुलावर जाते. करण त्या मुलाला पाहून विशाल आणि आरवला विचारतो : " रात्री नदीकाठी यायला मनाई आहे ना? मग हा मुलगा इथं काय करतोय?"

    विशाल करणला तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणतो : " मनाई रात्रीच नाही तर दिवसा साठी पण आहे. तरीही आपण तिघे आलो आहोत ना इथे. मग काय माहिती तो पण ही नदी पहायलाच आला असेल?"

    आरव त्या मुलाकडे जाताना म्हणतो : " आणि काय माहिती हा नदी पहायला नाही तर नदी दूषित करायला आला असेल? काय माहिती हाच नदीच्या श्रापा मागे असेल?"

    करण पण आरव च्या मागे निघून जातो. विशाल खवळून म्हणतो : " अरे ह्या दोघांना CID बनायची इतकी हौस का आहे?"

    मग तो ही त्या दोघांच्या मागे निघून जातो. जेव्हा पर्यंत आरव आणि करण तिथे जातात. तेवढ्या वेळेत तो मुलगा तिथून निघून जातो. करण त्या मुलाला आजूबाजूला शोधू लागतो. तेवढ्यात आरव खाली पडलेली ती फोटो उचलतो. त्या मुलांनी त्या फोटोला फाडून टाकले होत.

    आरव च्या घरी..

    आरव, करण आणि विशाल गोल बसले होते. त्यांच्या मध्ये एक टेबल होतं आणि त्या वर ती फाटलेली फोटो होती. विशाल त्या फोटोचा एक तुकडा उचलून म्हणतो : " इतके बारीक फाडले आहे की नाक आणि डोळा कुठे आहे तेच कळत नाहीये."

    आरव त्याच्या टोक्यात मारून म्हणतो : " उलटी पकडली आहेस तू ती फोटो."

    ते तिघे मिळून त्या फोटोला नीट लावतात. हे पाहून विशाल गांभीर्याने म्हणतो : " ही फोटो पाहून एक खूप मोठा सुराग लागला आहे आपल्या हातात."

    त्याला इतके गंभीर पाहून. ते दोघे त्याला पाहत विचारतात : " काय?"

    विशाल कुठल्या CID ऑफिसर सारखा म्हणतो : " ही फोटो एका मुलीची आहे."

    हे एकूण करण आणि आरव एकमेकांना बघतात. आरव करणला पकडतो. आणि करण तिच्या पासून सुटायचा प्रयत्न करत म्हणतो : " आरव तू सोड मला. आज मी ह्याच डोक फोडून बघणारच आहे त्यात काय आहे की नाय? "

    आरव त्याला न सोडता म्हणतो : " अरे जाऊदे आपलाच आहे."

    करण शांत होऊन विचारतो : " पण त्यांनी ही फोटो नदी काठी फाडून का फेकली असावी?"

    यावर विशाल उत्तर देतो : " काय माहिती त्याच ब्रेकअप झालं असेल."

    तेवढ्यात रूमच्या दरवाज्या वर हात आपटायचा आवाज येतो. आरव जाऊन दरवाजा उघडतो. समोर ईशानी होती. ईशानी आरवला पाहून म्हणते : " दादा, आई जेवायला बोलवत आहे तुम्हा तिघांना."

    आरव म्हणतो : " ठीक आहे. मी घेऊन येतो त्या दोघांना. "

    आरव ती फोटो ड्रॉवर मध्ये ठेऊन देतो. ते तिघे खाली जेवण करण्या साठी जातात. आरवला पाहून त्याचे वडील दिगंबर म्हणतात : " मग कसं चाललय कॉलेज? "

    यावर आरव smile करून उत्तर देतो : " छान चाललय बाबा. तुम्ही सांगा आई म्हणत होती मागे तबीयत बिघडली होती म्हणून, आता कशी आहे? "

    यावर दिगंबर हसत म्हणतात : " मला काय होतंय. शेतात राबणारे माणसं आहोत आम्ही, आशा छोट्या मोठ्या आजारांनी आमच केस की वाकडे होत नाही. "

    यावर स्वयंपाक खोलीतून चपाती घेऊन येत असणाऱ्या अर्चना म्हणतात : " हो शेतात झाडाखाली बसून माणसांची निगराणी करणे खूप मोठे काम असते ना? "

    अर्चनाच्या बोलण्यावर दिगंबर ला सोडून बाकी सर्वजण हसू लागतात. आरव चे वडील पण गावातले जमीनदारच होते. दिगंबरच्या नावावर 50 एकर जमीन होती. एक गावात घर. पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी जागा. जे त्यांच्या आजोबांनी घेतली होती.

    ह्या जमिनी सोने उगवतील अश्या आहेत. पण पाण्याच्या समस्येने आता ह्याच जमिनीत काहीही उगणे अवघड झाले आहे.

    हसत बोलत सर्वांचे जेवण होत. जेवणझाल्या नंतर दिगंबर आरव ला विचारतात : " मग उद्या जत्रेत जाणार आहेस ना? करण आणि विशालला पण आपल्या गावची जत्रा दाखव. "

    आरव होकार देत म्हणतो : " हो. आमचे आजच ठरले होत. उद्या इशू सोबत जाणार आहे. "

    यावर दिगंबर म्हणतात : " तुला रवी काका ठाऊक आहेत ना? "

    तर आरव आठवत म्हणतो : " हो आपल्या गावचे सरपंचच ना? "

    दिगंबर मान होकारामध्ये हलवत म्हणतात : " हो. त्यांना कळाले आहे की तू गावात परत आला आहेस. आज ते मला म्हणत होते की तुला त्यांच्या घरी जेवायला पाठवा म्हणून. जत्रा पाहून वेळ भेटला तर त्यांच्या घरी जाऊन ये. "

    आरव त्याला होकार देतो. मग तो करण आणि विशाल सोबत त्याच्या रूम मध्ये परततो.

    सकाळची वेळ..

    आरव आणि करण तयार झाले होते. पण विशाल आणखी तयारच होत होता. करण चिडून बाथरूम चा दरवाजा आपटत म्हणतो : " विशाल निघ ना बाहेर पटकन. किती वेळ लावत आहेस? कितीही वेळ लाऊन तयार झालास तरीही माकडच दिसणार आहेस. "

    तेवढ्यात विशाल दरवाजा उघडतो. विशाल त्याला तीक्ष्ण नजरेने पहात म्हणतो : " अरे जा रे. कॉलेज मध्ये मुली मला पाहून त्यांचं सुध हरवायच्या. "

    हे ऐकून करण हसत म्हणतो : " हा. तुला बघितल्यावर कोणी ही बेसुध होऊ शकतो. "

    ईशानी तिथे येताना म्हणते : " दादा झालं का? "

    जेव्हा विशाल ची नजर ईशानी वर जाते. तो तिला पाहतच राहतो. ईशानी न गुलाबी साडी घातली होती. केस मोकळे सोडले होते. डोळ्यात काजल लावले होत. आणि तिच्या सौंदर्याला चे वाढवत होत. ते होती तिच्या नाकात घातलेली नथ.

    आरव तिला पाहत म्हणतो : " तुला पाहिला सोयरे येणार आहेत का? इतकी का नटली आहेस? "

    ईशानी त्याला राघाने बघत म्हणते : " मी आणि माझ्या मैत्रिणी ने ठरवले होते की आज साडी घालायची. म्हणून घातली आहे. आणि तू ना चिंता करू नकोस कारण तुझ्या लग्ना च्या आधी मी लग्न करणार नाहीये. "

    अर्चना खोलीत येत म्हणतात : " तुम्ही आणखी इथेच आहात? लवकर जा आरती सुरू होणार आहे आता. "

    जत्रा..

    आरव, ईशानी, करण आणि विशाल जत्रेत आले होते. त्या चौघांनी गावातल्या महादेवाची आरती पाहिली. नंतर ते चौघे जत्रेत फिरू लागले. ईशानीला तिची मैत्रीण दीक्षा दिसते. मग ती तिच्या कडे निघून जाते. विशालची नजर ईशानी वरून फिरतच नव्हती.

    वाणी किर्ती सोबत जत्रेत आली होती. ती smile करत म्हणते : " किती वर्ष झाले होते जत्रेत येऊन. 4 वर्ष झाले मी जत्राच पहिली नाही. "

    किर्ती तिच्या समोर येऊन म्हणते : " आता आली आहेस ना. मग मन सोक्त बघून घे. तसा ही हा एकच दिवस असतो जेव्हा आपल्या गावातले कोणालाही गोवर्धन वाडीत जाण्या साठी थांबवत नाहीत. "

    हे एकूण वाणी म्हणते : " पण असे का? जर एक दिवस जाऊ शकतो तर बाकी दिवस का नाही? "

    किर्ती सावकाश आवाजात म्हणते : " मला पूर्ण कहाणी तर माहित नाही. पण म्हटलं जात की गोवर्धन वाडीत आणि वर्धा मध्ये कोणती तरी प्राचीन कहाणी आहे. हेच माहिती आहे मला. बाकी कोणाला विचारले तर ते म्हणतात की गोवर्धन वाढीचा श्राप वर्धा ला लागू नये, म्हणून वर्धाच्या लोकांना गोवर्धन वाडीत जाऊ देत नाहीत. "

    एक म्हातारा जो त्याच्या बाजूलाच होता. तो हसत म्हणतो : " माणूस किती ही पळाला तरीही कर्मा पासून पळू शकत नाही. कर्म त्यांच्या चुकीची परतफेड करण्या साठी वापस तिथं घेऊन च जातो. वेळ आली आहे. गोवर्धनला ह्या श्रापा पासून मुक्त करण्याची. वर्धा ला त्याची चूक दुरुस्त करण्याची. " त्या म्हातारा च बोलणं कोणाच्याही कानी पडले नव्हतं.

    तेवढ्यात कीर्तीची नजर गोळ्याच्या गाड्यावर गेली. ती वाणीला थांबायला सांगून गाड्या कडे निघून गेली. वाणी स्वतःशीच बडबडत म्हणते : " ह्या मुलीला काही खायचं दिसलं की ही दुनिया विसरून खायला निघून जाते. "

    करण ची नजर ही त्या गाड्या वर जाते. मग तो ही तिकडे निघून जातो. विशाल जो ईशानीला पाहत होता. तिची नजर एक मुलावर जाते. जो ईशानीलाच पाहत होता. पण त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन खराब होता. हे पाहून विशालला राग येऊ लागतो. त्याची मुठी रागात घट बंद होते.

    आरव त्याच्या फोन मधे बघत चालत होता. दुसरी कडे वाणी पण स्वतःशीच बोलण्यात इतकी मग्न होती की तिचे लक्ष आजू बाजूला घडणाऱ्या गोष्टींवर नव्हते. ते दोघे स्वतःत इतके मग्न असतात की चालता चालता एक मेकांना थडकतात. वाणी खाली पडणारच असते की आरव तिला पकडतो. त्या दोघांची नजर एक मेकांच्या नजरेशी मिळते.

    आणि कुठल्या तरी मुव्ही च्या सीन सारखं हे जग थांबत. जत्रेची ती गर्दळ त्या दोघांसाठी जशी शांत झाली होती. झुळ झुळ वाहणारे वारे त्या दोघांच्या केसाला हळुवार पणे उडवत होते. दोघांनी एक मेकांच्या हाताला घट पकडले होते. इतके घट जणू कोणी येऊन त्यांना लांब करेल.

    दोघांच्या हृदयात एक मधुर गीत वाजत होते. इतकेच नव्हे तर दोघांचा श्वास ही एका लयात चालत होत. तो मुलगा ईशानीच्या जवळ येऊन म्हणतो : " मी काही मदद करू का? "

    जेव्हा ईशानी त्या मुलाला पाहते. तेव्हा तिला त्या मुलापासून असुरक्षितता जाणवते. ती तिने नेसलेली साडी आपल्या कंबरेच्या चारी बाजूने लावते. आणि त्या मुलाला नजरंदाज करत दुकानदाराला म्हणते : " काका, ह्याच बांगड्या पिवळ्या रंगात नाहीत का? "

    तर तो दुकानदार म्हणतो : " नाही ताई, पण गुलाबी मधे आहेत बघा. दाखवू का? "

    ईशानी त्या दुकानदाराला बोलतच असते की तो मुलगा तिच्या कांद्यावर हात ठेवतो. ईशानी काही करायच्या पहिलंच कोणी तरी येऊन त्या मुलाचा हात पकडतो. हा विशाल होता. विशाल त्याचा हात पकडून ईशानी च्या कांद्यावरून काढून म्हणतो : " एकदा समजत नाही का तुला? ती तुला इग्नोर करत आहे ना. "

    यावर तो मुलगा म्हणतो : " तू कोण आहेस? आणि मी त्या मुलीला बोलत आहे. तुला का मिरचू लागत आहे? तू तिला पसंद करत आहेस का? तशी ती आहेच पटाखा. "

    त्याचे बोलणे ऐकून विशाल त्याच्या चेहऱ्यावर एक मुका मारतो. विशाल चा एक मुका खाऊन तो मुलगा जमिनी वर पडतो.

    विशाल त्या मुलाला त्याचा कॉलर ने पकडून उठवतो. तो त्याला खडी करतो आणि आणखी एकदा त्याचा चेहऱ्यावर मुका मारतो. तो त्याला असाच मारत होता. ईशानी एका बाजूला आश्चर्याने डोळे मोठे करून थांबली होती. दीक्षा ईशानी च्या जवळ जाऊन म्हणते : " इशू तू का आता पूर्ण ऍक्शन फिल्म पाहिल्या नंतर थांबवणार आहेस. जा ना थांबव त्याला. उगाच कोणी तरी मारायचं. आणि गावातले लोग घरी जाऊन काका सांगतील. तू जा थांबव त्याला."

    हे एकूण ईशानी भीत भीत विशाल जवळ जाते आणि म्हणते : " विशाल सोडा त्याला. जीव जायचा त्याचा."

    विशाल रागात त्याला मारत म्हणतो : " अश्या माणसांचं जिवंत राहण पण गरजेचं नाही. जो माणूस स्त्री ची इज्जत करू शकत नाही. जो तिला माणूस न मानता फटाका मानतो अशा माणसाच तर मारणं च समजा साठी गरजेचं आहे."

    ईशानी धाडस करत म्हणते : " प्लीज सोडा त्याला. उगाच ड्रामा क्रिएट नाही करायचा मला. तुम्ही उठा सोडा त्याला."

    ईशानीच्या वारंवार म्हण यावर विशाल त्याला सोडून देतो. वाणी आणि आरव आणखी तसेच थांबले होते. आरव ने वाणी ला सरळ थांबवले तर होते. पण दोघांनी आणखी हाथ सोडला नव्हता. त्या दोघांची ही ना हाथ सोडायची इच्छा होती. ना हाथ सोडवायची.

    दोघे एकमेकांचा हात पकडून एक दुसऱ्याच्या डोळ्यात पाहत होते. तेवढ्यात त्यांच्या कानी करण आणि किर्ती चा आवाज पडतो. ज्याने ते दोघे सुधी वर येतात. तेवढ्यात आणखी एकदा त्यांच्या कानी करण आणि किर्ती चा आवाज पडतो.

    किर्ती जोरात म्हणत होती : " हे माझे आहे. "

    यावर करण ही तितक्याच जोरात म्हणत होता : " हे मी घेतलं आहे पहिल्यांदा. "

    तर किर्ती डोळे मोठे करून म्हणते : " पण मी पाहिले होते पहिल्यांदा. "

    यावर करण ही डोळे मोठे करत म्हणतो : " डोळे मी ही मोठे करू शकतो. "

    गाड्यावरचे गोळे संपले होते. आणि ते दोघे एक्या गोळ्या साठी भांडत होते. आरव आणि वाणी दोघे पण त्या दोघांन जवळ येतात. किर्ती वाणीला पाहून म्हणते : " वाणी बघ ना. हा माझा गोळा मला देतच नाहीये."

    हे एकूण करण म्हणतो : " आरव बघ ना ही माजरीन मला माझा गोळा घेऊ देत नाहीये."

    करण च्या तोंडातून स्वतः साठी मांजरीण एकूण किर्ती रागात म्हणते : " मी मांजर. तर तू कोल्हा."

    कोणत्या चुकी बदल बोलत होता तो म्हातारा?
    कोणाला भेटेल हा गोळा?

  • 3. Practice - Chapter 3

    Words: 1

    Estimated Reading Time: 1 min

    k

  • 4. Practice - Chapter 4

    Words: 1

    Estimated Reading Time: 1 min

    o

  • 5. Practice - Chapter 5

    Words: 1

    Estimated Reading Time: 1 min

    m

  • 6. Practice - Chapter 6

    Words: 1

    Estimated Reading Time: 1 min

    k

  • 7. Practice - Chapter 7

    Words: 1

    Estimated Reading Time: 1 min

    के