ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r... ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x ek perfect kahani ke liye practice karna jaruri hota hai f f f a a s x c g r r d d d x
Page 1 of 1
Chapter 2 :-
नदीची कहाणी....
त्याचं बोलणं ऐकून रामचंद्र म्हणतात : " कारण त्या नदीचं पाणी कोणीही वापरू शकत नाही."
हे एकूण आरव विचारतो : " असे का आजोबा? "
तर रामचंद्र उत्तर देतात : " बाळा ही नदी श्रापीत आहे. माझ्यासाठी ही नदी आमच्या बालपणाची सुवर्ण आठवण आहे. पण काय माहिती कोणाची नजर लागली गोवर्धन वाडीला.... जाऊद्या तुम्ही आता आता अलात. यात लक्ष देऊ नका. "
हे एकूण आरव विचारतो : " आजोबा तुम्ही म्हटलं की हे नदी तुमच्या बालपणाची सुवर्ण आठवण आहे तर मग हे शापित कशी झाली? सांगा ना आजोबा, तुम्ही लहानपणी म्हटलं होत जेव्हा मी मोठा होईल तेव्हा तुम्ही मला सांगणार."
हे ऐकून रामचंद्र एक दीर्घ श्वास घेतात व तिघांकडे बघत म्हणतात : " ही गोष्ट 28 वर्षांपूर्वीची आहे. त्याकाळी गोवर्धन वाडीत पाण्याची समस्या नव्हती. ती नदी म्हणजे गोवर्धन वाढीचा शृंगार होती. आजूबाजूच्या गावातले लोक गोवर्धन वाडीला एक समृद्ध आणि संपन्न गाव म्हणून ओळखत असत. जिकडे नजर फिरल तिकडे हिरवीगार शेती होती. "
त्यांचे बोलणं ऐकत ते तिघे एकमेकांकडे पाहू लागले. रामचंद्र त्या आठवणीत विसरून म्हणत होते : " गावातल्या बायका आनंदाने नदीतून पाणी काढत असत. लहान मुले त्या नदीकाठी दिवसभर खेळ खेळायची. जी पंचायत आता जुन्या वड्याच्या झाडाखाली लागते. ती कधी नदीच्या बाजूला असलेल्या वड्याच्या झाडाखाली लागायची. ती नदी या गावातल्या लोकांसाठी मातेसमान होती. "
त्यांचं बोलणं ऐकून आरव आपल्या चेहऱ्यावर आश्चर्य घेऊन म्हणतो : " आजोबा, जर ती नदी इतकीच महत्त्वाची होती तर आता कोणी त्यातून पाणी का काढत नाही? आणि ज्या नदीला गावातले लोक माते समान मानत होते. आज तिला शापित का मानतात?"
हे ऐकून रामचंद्र ने त्यांचे डोळे मिटले. असं वाटत होतं ते त्या दिवसांच्या आठवणीत पुन्हा मिसळून गेले आहेत. रामचंद्र आपले डोळे उघडून म्हणतात : " माझ्या डोक्यातून त्या आठवणी काढून टाकाव्याशा वाटतात. पण माणूस म्हणून जन्मल्यावर अशा गोड कडू आठवणी तर मरेपर्यंत सोबत ठेवावेच लागतात. मला आजही आठवतं सोमवारचा दिवस होता तो. गावातली एक बाई पाणी भरायला नदीकाठी गेली होती. ती पाणी भरून घरी परतली. ज्यांनी ज्यांनी ते पाणी पेलं त्या सर्वांचा मृत्यू झाला. "
हे ऐकून आरव, करण आणि विशाल आश्चर्याने रामचंद्रला पाहू लागले. रामचंद्र त्यांच्या आश्चर्याची जाणीव ठेवून म्हणाले : " त्या परिवार मध्ये आठ जण होते. सासू, सासरे, ती बाई, तिचा नवरा, तिचा दीर, तिची जाऊ, आणि तिचे दोन लेकरं. गावातल्यांना आणखी कळालं नव्हतं की नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला."
तर करण विचारतो : " मग तुम्ही डॉक्टरला बोलावलं नव्हतं का?"
तर रामचंद्र उत्तर देत म्हणतात : " बोलवलं होतं. जमीनदार चा एक नातेवाईक डॉक्टर होता. तोच आला होता त्यांना बघायला."
मग विशाल विचारतो : " त्यांनी काय म्हटलं मग?"
यावर रामचंद्र उत्तर देत म्हणतात : " डॉक्टरांनाही काही समजलं नाही की त्या सर्वांचा मृत्यू कसा झाला होता. आजही त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आश्चर्याचा भाव आठवतो मला."
आरव विचारतो : " मग कोणाला समजलं की या सर्वांचा मृत्यू नदीतलं पाणी पिऊन झाला आहे? आणि जर डॉक्टरांनाही समजलं नव्हतं की त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे. तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांचा मृत्यू नदीतलं पाणी पिऊन झालं होतं? त्यांच्या मृत्यूचे कारण काही दुसरेही असू शकत?"
हे ऐकून रामचंद्र थोडे हसत म्हणतात : " तुम्हा तरुण पिढीला आमच्यावर रेशमात्र ही विश्वास नसतो ना? जाऊद्या, तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहेत माझ्या जवळ. त्यांच्या मृत्यूची बातमी गावभर पसरली होती तितक्यातच एक बाई नदीकाठी धुणं धुवायला गेली होती. पाण्यात उतरताच तिचा मृत्यू झाला. थोड्यावेळाने गाव वाल्यांना तिचा शव भेटला."
हे एकूण विशाल विचारतो : " पण असेही होऊ शकतं ना की धुणं धुवायला पाण्यात जाताना तिचा पाय घसरला असावा आणि तिचा तोल न सावरता ती पाण्यात पडून बुडून मेली असेल?"
हे ऐकून रामचंद्रच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागतं. रामचंद्र म्हणतात : " त्या बाईला ज्या माणसाने पाण्यातून काढलं होतं. एक दिवसाच्या आत त्या माणसाचा ही मृत्यू झाला. नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी ते पाणी त्यांच्या शेतात वापरलं त्यांचं पीक जळून गेलं ( पीक खराब झाले )."
हे ऐकून करण म्हणतो : " पण पिक तर जास्त पाण्याच्या वापराने ही खराब होऊ शकतं ना? आणि पीक खराब होण्याचे दुसरे भरपूर कारण असू शकतात."
तर रामचंद्र म्हणतात : " बाळा तू शहरातून आला आहेस तरीही तुला शेता बद्दल माहिती आहे. मग हे तर वर्षं वर्षी शेतात राबणारे शेतकरी आहेत. यांना त्या पिकाबद्दल किती माहिती असेल. तुझं म्हणणं तर असंच झालं ना की सोनाराला सोन्यात आणि पितळामध्ये अंतर समजत नाही. मला माहित आहे बाळांनो तुम्ही शहरातून आले आहात. तुमचे विज्ञान अशा गोष्टींना सत्य मानत नाही, पण आशा खूप गोष्टी आहेत. ज्याला विज्ञानही अन आयडेंटिफाइड अननोन म्हणतो. विज्ञान माणसाने बनवले आहे माणूस विज्ञानाने नाही. "
रामचंद्र च बोलन ते तिघेही लक्ष देऊन ऐकत होते. रामचंद्र : " तुम्ही तरुण आहात. तुमची बुद्धी चंचळ आहे. तुम्हाला नवीन गोष्टी जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असते. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न करणे हा तुमचा गुणधर्म आहे. प्रश्न करणे चांगली गोष्ट असते. पण कधी कधी मोठ्यांचं ऐकणंही महत्त्वाचं असतं. जाऊद्या, आपण आपल्या विषयाकडे येऊ. तुम्ही म्हणालात पीक जास्त पाण्यामुळे ही खराब होऊ शकतं. हो पीक जास्त पाणी घातल्यामुळे ही खराब होतं. पण ही गोष्ट शेतकऱ्यांनाही माहिती असते. शेतकरी शेतात तितकच पाणी घालतात जितकं गरजेचं असतं. "
त्यांचं बोलणं ऐकून करण होकारामध्ये आपली मान हलवतो. त्याचा होकार ऐकून रामचंद्र चा चेहऱ्यावर समजूतदारपणाची स्माईल येते.
रामचंद्र पुन्हा गंभीर भावाने म्हणतात : " हळूहळू गावातले सर्व पीक खराब होऊन गेलं. ज्या ज्या माणसाने ते पाणी पिल त्यांचा मृत्यू झाला. मग या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन गावातला सरपंचाने ही नदी बंद करायचा विचार गावासमोर मांडला. गावकऱ्यांनाही हे मान्य झालं की ती नदी शापित झाली आहे. मग सर्वांनी मिळून ती नदी अडवली."
आरव विचार करत म्हणतो : " सरपंचांनी नदी बंद करायचा विकल्प दिला होता ना. यात त्यांचा तर काही हात नव्हे?"
हे ऐकून रामचंद्र आपलं डोकं नकाराने हालवत म्हणतात : " तुमचं काही होऊ शकत नाही. यात सरपंचाचा काहीही हात नव्हता, कारण त्यांच्या पत्नीचाही मृत्यू संध्याकाळी त्या नदीच पाणी भरायला गेल्यावरच झाला होता."
यावर करण म्हणतो : " मग जमीनदाराचा असेल. अशा गोष्टी मागे जमीनदारच असतो. मी खूप पिक्चर मध्ये पाहिला आहे."
करण ने ही गोष्ट अशा पद्धतीने म्हटली होती की त्याचं बोलणं ऐकून त्या चौघांनाही हसू येत. रामचंद्र हसतच म्हणतात : " नाही यात जमीनदाराचा ही काही हात नव्हता. त्यांच्या तरुण मुलीचा मृत्यू ही त्या नदीतलं पाणी पिल्यामुळे झाला होता. आता तुम्हीच विचार करा. जर त्यांनी काही केलं असतं. तर त्यांच्या घरच्यांचा मृत्यू का झाला असता?"
त्यांचे बोलणं ऐकून ते तिघे ही शांत होतात कारण रामचंद्र ची गोष्ट सत्य होती. जर त्यांनी काही केलं असतं तर त्यांच्या घरातला कोणाचाही मृत्यू झाला नसता. तेव्हा विशाल विचारतो : " आजोबा, आपण एखाद्या गोष्टीला शापित तेव्हा म्हणतो ना जेव्हा तिला शाप भेटला असेल मग या नदीला दूषित न म्हणता शापित का म्हणत आहेत."
हे ऐकून रामचंद्रच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे गंभीर होतात. रामचंद्र त्यांचे डोळे चोरत म्हणतात : " बाळा ज्या नदीमुळे इतक्या लोकांचा मृत्यू झाला. त्या नदीला लोक शापितच म्हणणार ना? चला आता बस झालं तुम्ही खूप लांबून प्रवास करून आला आहात. जावा थोडी विश्रांती घ्या. उद्या गावामध्ये जत्रा लागणार आहे. वर्षभरात हा जत्राचाच दिवस असतो जेव्हा गोवर्धन वाडीत निराशा नसून आनंदाचे वातावरण असते. गावात येऊन जर जत्रा पाहिली नाही, तर काहीच पाहिलं नाही. उद्या ईशानी तुम्हाला जत्रेत घेऊन जाईल."
मग आरव म्हणतो : " आजोबा, मी विचार करत होतो. आता जाऊन गाव फिरून यावे. विशालने पहिले कधीही गाव पाहिलं नाही."
यावर रामचंद्र म्हणतात : " चांगला विचार आहे पण आता नका जाऊ... आता दुपार आहे. ऊन कडकडून पडत आहे. संध्याकाळी शिराळ पडली की, मग गावात फेरफटका मारून या."
ते तिघे ही आरवच्या खोलीत येतात. आरवच्या खोलीत आल्याबरोबरच करण आणि विशाल जोरजोराने हसू लागतात. करण हसतच म्हणतो : " चिकू.. आरव तू आम्हाला कधी सांगितलं नाहीस की तुझं नाव चिकू पण आहे. "
हे ऐकून आरव पलंगावरची एक उशी करण वर फेकत म्हणतो : " तुला खूप हसू येत आहे. मी विशाल ला सांगू का शिल्पा तुला काय म्हणायची?"
विशालच्या डोळ्यात चमक येते तो आरव कडे पाहून म्हणतो : " हो सांग ना आरव, मलाही ऐकायचे आहे."
करण त्याचे डोळे मोठे करून आरवला म्हणतो : " आरव विचारही नको करू. "
आरव हसत करणला पाहून म्हणतो : " का आता काय झालं आता हसू येत नाहीये का तुला?"
त्या तिघांच्या गप्पा अशाच चालू असतात. बघता बघता संध्याकाळ होते. जसे त्या तिघांचे ठरलं होतं ते तिघेही गावात फिरायला निघून जातात. ते गावभर फिरत असताना आरवला ओळखणारे माणसं थांबून त्याच्याशी बोलत होते. आरवला प्रश्न करत होते, की तू कुठे राहतो? काय शिक्षण घेत आहेस? व नदीकाठी न जाण्याची हिदायत ही देत होते.
इतक्या लोकांकडून नदीकाठी जाऊ नका ऐकल्यानंतर त्या तिघांच्या मनातही नदीकाठी जाण्याची तीव्र उत्सुकता निर्माण होते. पण विशालला भीतीही वाटत होती. जेव्हा करण आणि आरव नदीकाठी जायचे ठरवतात तेव्हा विशाल घाबरत म्हणतो : " अरे नको ना.. काय माहिती खरंच ती नदी शापित असेल तर? आणि मी तर ऐकले आहे ज्या लोकांचा मृत्यू अचानक होतो त्यांची आत्मा भटकत असते काय माहिती ती सरपंचाची बायको आणि त्या बाईच्या आत्मा तिथे भटकत असेल तर?"
यावर करण हसत म्हणतो : " विशाल तू 21 व्या शतकामध्ये देखील भूतांवर विश्वास ठेवत आहेस? मला तर अजूनही वाटत आहे. ती नदी शापित नाही यामागे लोकांचाच हात आहे."
विशाल घाबरतच म्हणतो : " ते मला नाही माहित. पण मी स्वतः माझी मृत्यू ओढण्यासाठी नदीकाठी नाही जाणार."
हे ऐकून करण आणि आरव त्याचा हात पकडून त्याला वडत घेऊन जाताना, करण म्हणतो : " चल रे काही नाही होणार. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. "
विशाल रागात म्हणतो : " हो मला माहित आहे किती आहात तुम्ही सोबत. जर कोणतं भूत आलं तर तुम्ही मला त्याच्या समोर फेकून पळून जाणार."
हे ऐकून करण आणि आरवला हसू येऊ लागत. पण ते आपलं हसू लपवतात कारण जर ते दोघे आता हसले असते, तर विशाल त्यांच्यासोबत जायला तयार झाला नसता.
ते तिघेही नदीकाठी येतात. नदीच्या दोन्ही बाजूने लाकडे लावले होते. जेणेकरून कोणीही नदी जवळ जाऊ शकणार नाही. त्या नदीच्या जवळचा परिसर शांत होता. असं वाटत होते की त्या नदीच्या परिसरात देखील कोण आले तर त्याला ह्या नदीचा श्राप लागेल.
ती जागा इतकी रम्य दिसत होती, की कोणाच्याही मनावरचे भार इथे येऊन हलके होऊ शकतात. आरव त्या जागेला आपल्या नजरेत भरून घेत होता का मग त्या जागेची पडताळणी करत होता? हे त्याचे त्यालाच माहीत होते. विशाल आपल्या घाबरलेल्या मनाने आणि डोळ्याने ती जागा पाहत होता. पण त्याचे लक्ष जास्त करून तर तिच्या मनात चालू असलेल्या मंत्र जपावर होते.
करण देखील तिथल्या रम्य वातावरणाचा आस्वाद घेत होता.
त्या नदीच्या दुसरा बाजूने दोन मुली झाडातून बाहेर येत होत्या. त्यातली एक मुलगी घाबरून म्हणते : " वाणी काय करत आहे तू? माझे ऐक आपण नको जायला तिथे. जर गावात कोणाला कळलं ना की आपण नदी पहायला गेलो होतो. तर आपल्याला खूप ओरडा खावा लागेल."
हे एकूण वाणी तिला रागात पाहत म्हणाली : " किर्ती तू गावातल्या लोकांची इतकी का काळजी करत आहेस? कोणाला काहीही कळणार नाही. फक्त एकदाच तर मला ती नदी पाहून यायची आहे."
यावर किर्ती नकाराने मान हलवत म्हणाली : " हे पुणे नाहीये. गाव आहे. इथे एक कानाची गोष्ट दुसऱ्या कानाला कळायला फार वेळ लागत नाही. आणि तुला काय तुझे आई वडील वाचवतील. पण माझा काही तरी विचार कर? हे बघ, उद्या आपण जत्रेत जाणारच आहोत ना. मग तेव्हा बघ ना तू तुला जे पाहिचे आहे ते."
किर्तीच बोलणे ऐकून वाणी तिला तीक्ष्ण नजरेने पहात म्हणाली : " मी म्हंटल ना. आपण आताच जातोय. मग आता एकही शब्द काढायचा नाही तोंडातून. गप चल."
हे म्हणत वाणी कीर्तीचा हात पकडून दिला नदी काठी घेऊन आली. नदीकाठीच्या रम्य वातावरणाला पाहून वाणीला मोकळ वाटू लागलं. शहरातून आलेल्या मुलीकडे पाहताना गावातल्यांच्या ज्या तीक्ष्ण नजरा असतात. वाणीला त्या नजरेतून लांब आल्या सारखं वाटू लागलं.
खुपदा जीवनात माणसाला एक अशी जागा हवी असते. जिथे कोणी त्याला जेज करणार नाही. आणि सध्या वाणीसाठी ती जागा ही होती. वाणी डोळे मिटून आकाशाकडे चेहरा करून आपल्या हाताला पसरवले होते.
नदीच्या दुसरा काठी आरव जो आशयाचं पोझिशन मधे होता. त्यांनी आपले डोळे उघडले. व नदी कडे पाहू लागला. तेवढ्यात तिची नजर दुसऱ्या बाजूला थांबलेल्या दोन मुलीनवर गेली. त्या मुली तिच्यापासून बऱ्याच अंतरावर होत्या. त्यामुळे तो त्या दोघींचेही चेहरे पाहू शकला नाही पण त्यांच्या कपड्यावरून त्याला हे समजले की त्या दोन मुली आहेत.
संध्याकाळ हळूहळू रात्र मध्ये बदलत होती. जसा जसा सूर्य मावळून अंधार येत होता तसे तसे विशालची भीती वाढत होती. थोड्यावेळाने त्या दोन्ही मुली तिथून निघून गेला. मग हे तिघेही निघायला तयार झाले. आरव तिथून आपला पाय पुढे घेणारच होता की त्याच्या कानामध्ये एक विचित्र आवाज पडला. नकळत आरव मागे फिरला. तो एक पाऊल वाढवत नदीकडे जाऊ लागला. हे पाहून करण आणि विशाल अचंबित राहिले. विशाल आरवला पुन्हा पुन्हा आवाज देत होता पण जसे आरवला त्याचा आवाज ऐकूच येत नव्हता.
तो कोणाच्यातरी वश मध्ये झाल्यासारखा नदीकडे जात होता. बघता बघता आरव त्या लाकडांना बाजूला करून त्या नदीच्या जवळ गेला.
ही नदी खरच श्रापीत आहे का?
रामचंद्र काही लपवत आहेत का?
रामचंद्र ने सांगितलेली गोष्ट पूर्ण सत्य आहे का?
k
k
o
m
k
के