अलाबाद नावाचं एक छोटसं गाव होत... त्या गावात धनाजी पाटील नावाचे सरपंच होते... त्यांच्या गावात खूप मोठा त्यांचा दरारा होता.. त्यांना खूप नवस बोलून एकच मुलगी झाली.. तिचं नाव त्यांनी अनघा ठेवलं.. तशी त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी होती.. अनघा पूर्ण प्रॉपर्... अलाबाद नावाचं एक छोटसं गाव होत... त्या गावात धनाजी पाटील नावाचे सरपंच होते... त्यांच्या गावात खूप मोठा त्यांचा दरारा होता.. त्यांना खूप नवस बोलून एकच मुलगी झाली.. तिचं नाव त्यांनी अनघा ठेवलं.. तशी त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी होती.. अनघा पूर्ण प्रॉपर्टीला वारस म्हणलं तर एकटीच होती.. कारण धनाजी पाटलांना एक भाऊ होता.. प्रदीप पण ते dr होते.. त्यांनी लव मॅरेज करून डॉक्टर मुलगी शी लग्न केल .. ते धनाजी पाटलांना आवडलं नाही... पण तरी घराच्या इज्जतीसाठी त्यांनी त्याला एक्सेप्ट केलं.. पण एक अट ठेवली होती की प्रदीप च्या बायकोने तिच्या घरच्यांशी सगळे रिलेशन नाती सोडून द्यायची.. त्यांना कधी न भेटण्याची.. आणि प्रदीप ची बायको प्रणालीला हे सगळं मान्य केलं.. कारण ति मनापासून प्रदीप वर प्रेम करायची.. तसे धनाजी पाटील मनाने खूप चांगले होते.. पूर्ण गावातली लोक त्यांना घाबरायचे पण गरिबांना मदत करण्यापासून ते कोणालाही कसलीच कमतरता गावात पडू नये याची सगळी जबाबदारी मात्र त्यांनी उचलली होती.. खूप शेती होती त्यांची.. आणि पूर्ण गावामध्ये त्यांच्यासारखं घर कोणाचं नसेल.. एवढा मोठा बंगला त्यांचा होता.. धनाजी पाटलांनी प्रदीप ला आपल्या मुलासारखाच वाढवलं होतं.... प्रदीप चा गावात एक छोटासा दवाखाना होता.. आणि ते दोघे नवरा बायको तिथेच काम करायचे.. आणि जेव्हा त्यांचे लग्न झालं तेव्हा त्यांच्याही नशिबात मूल झालंच नाही.. आणि म्हणूनच काहीसं त्यांनी ही अनघाला च आपली मुलगी समजल.. पण धनाजी पाटलांनि गावात मात्र एक गरीब मुलगा होता त्याला दत्तक घेतल होत.. त्याची सगळी जबाबदारी त्यांनी आपल्या वर घेतली... त्यामुळे अनघा ला भाऊही मिळाला होता.. पण तरीही सगळ्या प्रॉपर्टीची ती एकटी मालकीण होती.. अनघाची आई तिच्यावर खूप जीव लावायची.. एवडी खरोच जरी आली की धनाजी पाटील आणि त्यांची बायको घर डोक्यावर घ्यायची.. आता जवळजवळ ती सात वर्षाची झाली होती... आणि ती स्कूल ला गेली होती... आणि धनाजी राव खूप वेळ झाला तिची वाट पाहत बसले होते... त्याने अनघाच्या आईला आवाज देतात , सुशीला तुला काय पोरगी ची काळजी वगैरे आहे काय नाही, बघ किती वेळ होऊन गेला आता शाळा सुटून अजून कुठे आले नाही बघून ये.. त्यावर सुशीला बाई धनाजी रावांना म्हणतात,"अहो तुम्हाला तर तिचा स्वभाव माहिती आहे ना, पूर्ण शाळेला जोपर्यंत ती घरात सोडून येत नाही तोपर्यंत आपल्या घरी येत नाही, अगदी तुमच्यावरच गेली आहे ती, समाजसेवा तिच्या अंगात भरली आहे ना.. त्यावर धनाजीराव हसत म्हणतात,"अखेर मुलगी कोणाची आहे". त्यावर सुशीला बाई हसत त्यांना म्हणतात,"मग लेट झाला तर माझ्या मागे कुणकुण नका लावत जाऊ.. त्यावर धनाजीराव हसत म्हणतात, हो बाई..
Page 1 of 1