Novel Cover Image

प्रेम यातना

User Avatar

Kavita Parabkar

Comments

0

Views

7

Ratings

0

Read Now

Description

प्रेम म्हणजे काय ? एकत्र येणे म्हणजे प्रेम... सोबत राहण म्हणजे प्रेम नाही प्रेम म्हणजे, आहे तसं आहे त्या परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला एक्सेप्ट करण... मनापासून प्रेम असेल ना तर समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला कोणत्या चुका दिसणार... हाय फ्रेंड माझी स्ट...

Total Chapters (3)

Page 1 of 1

  • 1. प्रेम यातना - Chapter 1

    Words: 1820

    Estimated Reading Time: 11 min

    मिराचा आज पहिलाच काॅलेज चा दिवस होता.ती खुप खुष होती.पटापट आवरुन तिला आज लवकर जायच होत.पण आज तिला खुप लेट होत होता.मीरा ममी तिला आवाज देते.मिरा आवरले काय नाही.पटकन खाली ये नाष्टा करुन घे.मिरा खाली येते म्हनते नो ममा मला खुप लेट होतोय मी बाहेरुन काही तरी खाते .तरी ममी म्हनते थोडे तरी खा ना बाळा.मीरा साॅरी ममा मला लेट होतोय मला टिपीन दे मग जाते ममी टिपीन देते बाय करते.
       मिरा माया आणि मनोज ची एकुलती एक मुलगी.मीरा नंतर काही मुल दुसरे झालेच नाही.त्याणी ही मिरालाच आपली मुलगा मुलगी मानले.मिरा हि खुपच समजुदार होती.तशीच  देखनी ही लाब केस नाजुक नाक.काळे डोळे गोरा रंग कोनिही एकदा पाहिले कि पुन्हा पाहेल अशीच होति मिरा.जशी दिसायला सुंदर होति तशीच स्वभाव पन सुंदर होता.बोलन्यात गोडवा होता.
    मिरा चे वडील पोलीस होते.ते खुप चागल्या पोस्ट वर होते.त्या मुळे मिरा ला लहान पणा पासुन कसलीच कमी नाही पडली.मिरा ही काहिच मागाची नाही न मागता तीला तिचे वडील देत होते.मीरा वर त्याचा खुप जिव होता.तीला ताप तेन आला ते रात्र जागुन काडायचे.मीरा ही काही कमी नाही ती पण वडीलाच्या वर खुप  जिव लावायची.ते आल्याशिवाय ती कधी जेवायची नाही.वडीलाच कामात रिस्क आसल्यामुळे तीला त्याची खुप भिती वाटायची .ते कामावरून येत नाहीत तोवर ती वाट पाहत बसायची.
    आज तिचे वडील लवकर गेले होते.मिरा काॅलेज ला चालली होती.ममी ला बाय करुन आपली स्कुटी घेऊन ती चालली होती.नवीन कोॅलेज नवीन मित्र नविन टीचर.मीराला खुप टेनशन आले होते.विचार करत करत कधी कोॅलेज ला पोचली तिलाच समजले नाही.घड्यालात पाहिले तर तीला खुपच लेट झाला होता.बाजुला काही मुली होत्या त्याना तिने बीएसी 1 वग॔ विचारुन ती पटापट तिच्या क्लास मध्ये जातच होती की....
     मिरा क्लास मध्ये जातच होती तीला आटवले ती चावी गाडी ला विसरली आहे.पटकन मागे वळते आणि राज ला जोरात धडकते.ती स्वाॅरी म्हनते आणी त्याच्या कडे न बघता निघुन जाते.राज मात्र तीचाकडे पाहत असतो ती दिसत नाही तोवर.

      राज माथुर एक मिडल क्लास फॅमीली मधील मुलगा.खुप हुशार आणी हॅनसम.आज वर त्याने कुटल्याच मुली कडे वळून पाहिले नाही.राज चे वडील शाळेत शिक्षक होते.दोन मुले एक मुलगी रीया आणी राज.त्यामुळे घर खर्च आणी मुलाच शिक्षण येवडेच भागत होते.राज चे वडील खुप प्रामाणीक होते.राज पण त्याचा सारखा झाला होता.राज च IAS होन्याच स्वॅप्न होते .पन मिरा ला पाहताच बघत राहीला.
      थोडा वेळ थाबुन राज आपल्या क्लास मध्ये निघुन जातो.मिरा पन त्याच क्लास मध्ये येते जीथे राज असतो.मिरा रिकामा बॅन्च वर जावून बसते.राज मात्र तीच्या कडे पाहत असतो.राज मित्र ओमकार त्याच्याकडे बघत असतो.राज ला हलवतो."क्या बात है" राज आज मुलगी कडे पाहत आहे.राज पण हसुन काही नाही बोलतो.क्लास सुरू होतो.टीचर प्रत्येकाला आपली माहीती सागायला सागतात.मिरा आणी राज ला सेम मार्क असतात .तेव्हा मिरा राज कडे पाहते त्याची नजरा नजर होते एक सेकंमीरा क्लास मध्ये इंट्री करनार असते तिथे बरोबर राज पण तिथेचा गाडी लावत असतो. दोघे एकमेकांना पाहतात राज तर मेरा कडे पाहतचा राहतो ती काल चा पेक्षा पण सुंदर दिसत होती. राज ब्लू शर्ट आणि ब्लॅक जिन्स मध्ये कुछ हँडसम दिसत होता. दोघे पण एक मिनिट एक मेकाकडे पाहत होते. तोवर राज चा मित्र येतो. हे राज करत तो जवळ जातो तेव्हा कुठे दोघे भानावर येतात. मीरा ला कसतरी वाटते आपण काय करत होतो. तिची तिला लाज वाटू लागली. ती पुढे जाणार होती. की राज चा फ्रेंड्स तिला थांबतो.
     हे मीरा तू आमचा क्लास मध्ये आहेस ना. मी काल पहिले तू introduntion देत होतीस तेव्हा. मीरा पण हो म्हणते. ओमकार राज चा मित्र म्हणतो " ही मीरा मी ओमकार आणि हा माझा मित्र राज काय तू आमचा शी फ्रेइन्डशिप करशील काय. मीरा थोडा वेळ विचार करते हो बोलते.ओमकार ला shak hand करते. राज पण हात पुढे करतो पण धडधड खूप वाढली होती. कस तर हात पुढे करते आणि निघून जाते.
     राज आपल्या हाताकडे पाहतच राहतो. त्याला कुठे तरी करंट लागल्यावणी झाले होते. ओमकार त्याला भानावर यायला सांगतो.त्याला चिडवत क्लास मध्ये निघून जातात 
    क्लास मध्ये मीरा आणि राज की सारखी नजरा नजर होत होती.एकमेकांना चोरून पाहत होते राज तर सारखा आपल्या हात कडे पाहत होता मीरा ने पहिला टाइम्स हात हातात दिला होता. आणि राज ला आखरी तक तो तसाच राहू द्याचा होता . त्याने मनाचा पक्क केल होत.त्याने ठरवलं होत काही झालं तरी मीरा सोबत आपण पूर्ण life घालवाची.विचार करता करता कधी lecture संपले समजले नाही.सगळे क्लास मधून तिचा मागे राज होता कशी तरी गाडी जवळ आली तोवर राज पण पोचला होता. राज ने तिला थांबवले थोडे बोलाचे होते असे बोलला. मीरा ला काय बोलायचं हेच सुचत नव्हते. न राहून ती बोलते मला लेट होतोय आपण उद्या बोलू. राज बोलतो की आपण उद्या कॉलेज चा बाहेर भूटूया काय मीरा ला काय बोलायचं सुचत नव्हते तिची अजून ओळख पण येवडी झाली नव्हती. तिचा ही न कळत ती हो बोलून जाते. पटकन गाडीवर बसून निघून जाते.
     राज आज खूप खूष असतो. उद्या काही करून तो आपल्या मनातील मीरा ला सांगणार असतो. त्याने ठरवले होते की लावणं केल तर मीरा सोबत नाहीतर कोणासोबत नाही. राज असा कोणावर पण लागचा प्रेम करेल असे त्याला नाही वाटले पण जेव्हा मीरा आली आणि तिला पाहुन असे वाटाय खूप वर्षा पासून तिला पाहतोय. म्हणतात ना प्रेमात पडायला एक मिनिट सुद्धा काफी असतोय. दिल सच्चा होणा चाहिये. प्रेमात सगळे जग चांगलं वाटायला लागतंय. सगळे कस सोपं वाटाय. राज पण पण तसंच्छा झालं होत. त्याला हे पण वाटते की मीरा त्याला हो म्हणेल. मनातून तो खूप खूष होता कधी एकदा उद्या चा दिवस येतोय असे झालं होते.
     पण येते मीरा च मन तिला खात होत की  एवढ्या लवकर कसे काय मित्र बनवले  उद्या राज ला काय बोलायचे असेल  तिला मनातून समजले होते राज ला ती आवडू लागली आहे. मीरा ला पण राज आवडत होता पण  lifepatnar म्हणून तिने कधी तसा विचार नाही केला. मीरा ला खूप टेंशन आले होते राज ने तिला प्रोपोज केले तर ती एवढ्या लवकर हो पण बोलू शकली नव्हती आणि राज आवडतो .. हे सांगू पण नव्हती शकली.तिने ठरवले  उद्या आपण कॉलेज ला जायचे नाही.
     दुसऱ्या दिवशी राज लवकर उठला खूप छान तयार होऊन कॉलेज ला जायला निघाला. बाईक घेऊन तो जात होता. आज खुप हँडसम दिसत होता. किती तरी मुली त्याचा कडे पाहत होत्या पण तो मीरा चा वाटे कडे डोळे लावून बसला होता.खूप वेळ झाला तरी काही मीरा आली नाही तो खूप निराश झाला त्याने क्लास मध्ये पहिले मीरा आली काय पण तिकडे पण ती नव्हती. त्याचा क्लास मध्ये बसण्याचे मन होत नव्हते तो. थेट बायेर निघून आला. त्याचा मनात राहून राहून मीरा चा विचार होता ती ठीक असेल काय तिला काही झाले नसेल ना, असे नको ते विचार येत होते. त्याचे मन घाबरले होते. पण काय करबार मीरा चा फोन नो पण त्याच्याकडे नव्हता. तो निराश होऊन आपल्या घरी निघून जाती.
     येते मीरा ला खूप वाईट वाटते असते की आपण गेलो नाही याचे. राज आपली वाट पाहत असेल असे वाटते होते. पण तिला पण राज ला न पहिल्या मुळे करमत नव्हते ती पण ठरवते उद्या राज शी आपण बोलूया. त्याला सांगू की मला ही तू आवडू लागला आहे. एक दिवस न पहिले तर मीरा ला कस तरी होत होते  ती उद्या चा दिवसाची वाट पाहू लागली होती.
      येते मीरा ची आई तिचा वडिलांना सांगत होती मीरा मोठी होत आहे लवकर आपण मीरा ला एक चांगला मुलगा बगु लग्न करून देऊ.मीरा चा वडिलांना कॅन्सर असतो. ते त्यांना तेवढे माहित झाले होते त्यांनी मीरा आणि मीरा चा आई ला सांगितले नव्हते. ते पण मीरा चा आई ला सांगतात की माझ्या माहितीत एक मुलगा आहे. माझा मित्र आहे त्याला मी वचन दिले आहे की माझ्या मुलगी च लग्न तुझ्या मुला सोबत च होईल.मुलगा इन्स्पेक्टर आहे. खूप केसेस त्याने सॉल्व केलेत. इन्टीलिजन्ट आणि हँडसम आहे. पैस्याची कमी नाही. घरी पण सगळे खूप चांगले आहेत. आपल्या मुलीला सुखात ठेवतील.मीरा ची आई खूप खूष होते ती म्हणते "लवकर त्यांना आपण घरी बोलवून घेऊ " तिचे वडील पण म्हणतात हो काही झालं तरी लवकर त्यांना बोलवायला पाहिजे माझ्याकडे वेळ कमी आहे. मीरा चा आई ला काही समजले नाही ती काय? विचारते पण ते काही नाही म्हणतात.मीराची आई पण जास्त विचार न करता कामाला निघून जाते. तिचे वडील मात्र विचार करत बसतात पुढे काय करायचे याचा.
    मीरा रोज चा सारख आवरून पटकन कॉलेज ला जायला निघते. कधी एकदा पोचतोय असे झाले होते तिला. आपली स्कुटी घेऊन ती निघाली. पण वाटेत काही लोक जमले होते. असे वाटते होते. ऍसिडन्त झाला आहे कोणाचातरी ती खाली उतरून पाहायला जाते.आणि ती रडायला लागते. तिचा तोंडातून शब्द फुटेना. तिला काहीच सुचत नाही. कस तरी ती खाली बसते आणि" राज राज काय झालं उठ ना रे म्हणत होती. कारण राज गाडी वरून पडला होता आणि त्याचा डोक्यला खूप लागले होते. मीरा कशी तरी सवरते आणि हेल्प मी करत सगळयांना बोलतावत असते. आणि राज ला बोलवत असते राज तुला काही नाही होणार. मी तुला काही होऊ नाही देणार. प्लीज डोळे उगड. राज बेशुद्ध होत होता त्याला मीरा चा आवाज थोडा थोडा ऐकू येत होता. मीरा ला बोलवत होता मीरा जवळ जाते राज बारीक आवाजात तुटक तुटक काल काय आली नाहीस म्हणत होता. तोवर राज बेशुद्ध झाला.
       मीरा ला खूप वाईट वाटते. ती स्वतः ला दोष देत असते. तिला वाटते आपल्या मुळे हे हे सगळे झाले. आपण काल आले असतो तर हे झाले नसते. मीरा ला विचार करायला वेळचा नव्हता काही करून तिला हॉस्पिटल ला राज ला घेऊन जायचे होते कस तरी करून एका गाडी  भेटते. ती राज ला घेऊन हॉस्पिटल ला जाते खूप रक्त येत होते डोक्यला खूपच लागले होते. ती dr म्हणते काही करून वाचवा.मीरा ला त्याचा घरचा बदल विचारू लागतात. मीरा सांगते मी त्याची मैत्रीण आहे काय झाले तो ठीक आहे ना . Dr तिला बसायला सांगून राज ला आत मध्ये घेऊन जातात. थोडा वेळा ने dr बाहेर येतात. मीरा ला सांगतात लवकर त्याचे ऑपरेशन करावे लागेल त्याचा घरच्याना बोलवा. लवकर झाले नाही तर त्याचा जीवाला धोका आहे. मीरा खूपच रडायला लागते. तिला काही सुचत नाही. मीरा कडे तर राज चा घरचा फोन नंबर पण नव्हता. तिला आटवले राज पडला होता तिकडे त्याचा फोन तिला सापडला होता.ती पटकन आपल्या बॅग मधून फोन काढते आणि त्याचा घरचा नंबर शोधू लागते. आणि फोन करून सांगते की राज चा ऍसिडन्ट झाला आहे लवकर या.
    मीरा खूपच घाबरी होती. राज जवळ जाते आणि रडत रडत बोलू लागते. राज उठ ना लवकर मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत.तुझा शिवाय जगण्याच विचार पण नाही केला मी. प्लीज उठ ना राज.माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही राहू शकत. राहीलले सारे आयुष्य तुझ्या सोबत घालवाच आहे. प्लीज राज आयुष्यात पहिल प्रेम आहेस तू. तू मला सोडून नाही जाऊ शकत म्हणते. रडत बाहेर निघून जाते. तोवर राज चा घरचे येतात. राज ची आई खूप रडत असते. रिया पण राज कडे पाहून खूप रडू लागते. Dr सांगतात राज ऑपरेशन साठी 4 लाख पाहजीये आणि लवकर ऑपरेशन करावे लागणार आहे. राज चा वडिलांना कडे एवढे पैसे कोठून आणायचे हेच समजतं नव्हते. त्याचा कडे राहते घर सोडले तर दुसरे काहीच नव्हते त्यांनी. ऱ्यांनी ते गहाण ठेऊन पैसा ची जोडणी लावतात.
        येते मीरा हॉस्पिटल मध्ये एक मंदिर असते तिकडे जाते. देवाला प्रार्थना करते की राज लवकर बरा होऊ दे.मीरा राज जवळ पुन्हा येते तिकडे त्याचे आई वडील आले होते त्याना सिस्टर रे सांगितले होते की राज ला एक मुलगी घेऊन आली आहे. राज ची आई मीरा जवळ येते आणि तिचा चेऱ्यावरून हात फिरते व हात जोडून थँक्स म्हणते. पण मीरा त्याना थांबते. आणि बोलते की राज ची मत्रीण आहे.दोघे एका च क्लास मध्ये आहोत. तुमी थँक्स नका बोलू. राज चे ऑपरेशन सुरु झाले असते. सगळयांचे डोळे ऑपरेशन थेटर कडे लागले होते.....

  • 2. प्रेम यातना - Chapter 2

    Words: 1613

    Estimated Reading Time: 10 min

    थोडा वेळाने dr भायेर येतात. ऑपरेशन succesful म्हणून सांगतात. सगळयांचा चेहऱ्यावरले टेंशन कमी झाले होते. मीरा पण थोडी रिलॅक्स झाली होती. राज ची फॅमिली आत पाहायला जाते मीरा बाहेर थांबते. राज थोडे आठवत होते की तिला मीरा घेऊन आली होती. ती रडत होती पण कुठे दिसत नव्हते. तो थोडा निराश झाला होता त्याची आई वडील राज ला बरे वाटतंय काय विचारतात. तो हो म्हणतो त्याचा आई ला रडूच येत होते. राज आई ला शांत करत म्हटतो. मी बरा आहे आई तू रडू नको. आई बाबा बाहेर निघून जातात. तिया जाता ना थांबते आणि बोलते तू जिची वाट पाहतोस ती बाहेर आहे मी पाटवून देते. ती बाहेर जाते.

      मीरा ला आत कसे जायचे समजत नव्हते. राज ला शुद्ध नव्हती तेव्हा ती खूप काही बोलली होती. रिया तिला सांगते आत जाऊन ये. तुझ्या घरचे वाट पाहत असतील खूप लेट झाला आहे . ती हो बोलून आत मध्ये जाते 

      आत मध्ये मीरा जाते.राज ची ती अवस्था बगुन खूप वाईट वाटते. तिला तर रडूच येत होत. राज तिला शांत करतो. आणि मी आता बरा आहे असे बोलतो. मग राज मीरा ला विचारतो की ती काल का आली नाहीस मी खूप वाट पहिली. ती सॉरी म्हणते. उत्तर दयाचे टाळते. राज पण जास्त न विचारता मीरा मला काही सांगायचं होत. मला माहिती आहे ही वेळ नाही आहे पण मी जास्त वेळ सांगायचा आधी नाही राहू शकत. मीरा ला तेच पाहिजे असते मीरा पण राज शिवाय राहू शकत नव्हती. ती पण काय ते विचारते.

       राज " मीरा मी तुला जेव्हा पासून पहिले आहे. तेव्हा पासून तू मला खूप आवडते आहेस. सारख वाटते की तुलाच पाहत  बसावे तुझ्या सोबत बोलावे. मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत माझं तुझ्या वर खूप प्रेम आहे. "मीरा ऐकून घेत होती तिची धडधड खूप वाढली होती. ती पण तेच ऐकायचं होत. पण एक भीती पण वाटते होती. ती कसली ते तिलाचा माहित नव्हते. राज च बोलून झाल्यार तो मीराचा उत्तरांची वाट पाहत होता. मीरा पण बोलायला लागते " राज माझं पण तूझ्या सारखं झाले आहे. मी पण जेव्हा तुला पहिले आहे तुझा विचार येतो मनात. मला ही तू खूप आवडू लागला आहेस. माझं तुझ्या वर खूप प्रेम आहे ".तुझी ती अवस्था बघून मी खूप घाबरले होते. प्लीज मला सोडून कधीच जाऊ नकोस आणि ती रडू लागते राज तिला खुर्ची वर बसायला सांगतो. तिचा हात हातात घेऊन सांगतो मी कधीच तुला सोडून नाही जाणार. ती पण लगेच त्याला जवळ घेते. थोडा वेळाने ती भानावर येते. राज ला म्हणते मी उद्या येते भेटायला. मला लेट होतोय मी निघते आता राज च मन तर नव्हते ती जावं पण जावं तर ला गणार होते. मीरा घरी निघून जाते राज आज खूप खूष असतो. त्याला आता लवकर बरे व्हायचे होते फक्त मीरा साठी.

    मीरा ही घरी जाते ती पण आज खूप खूष असते. ती फ्रेश होऊन. जेवण करून आल्यावर रूम मध्ये जाते आजचा पूर्ण दिवस आठवत असते. ती राज ची आठवण काढून लाजत होती.
      काही दिवसांनी राज ला डिस्चार्ज भेटला मीरा रोज येऊन भेटून जात होती. कॉलेज पण चांगले चालेले होते. नोट्स ते राज ला देत होती. दोघे पण हुशार होते. त्या मुळे राज ला सुट्टीघेतली त्याचा काही फरक नाही पडला. मीरा आणि राज चा प्रेम वाढत चालले होते. अबोल प्रीत बहरली होती. राज आणि मीरा रोज कॉलेज मध्ये भेटत होते. सगळ्या कॉलेज मध्ये समजले होते. ती दोघे प्रेम करतात ते. एक दिवशी राज मीरा ला घेऊन फिरायला जायचे ठरवतो. मीरा ही तयार होते. जायला. उद्या जायचे म्हंटले होते राज ने. मीरा घरी येते उद्या ची ची तयारी करू लागते मस्त छान साडी काढते. उद्या पहिली वेळ होती ती राज सोबत फिरायला जात होती. आरशात पाहून लाजत होती. ती ठरवते ती आपल्या जवळचे एक लॉकेट काढते त्याला मस्त चैन अडकवते आणि आपल्या बॅग मध्ये ठेवून देते. ती उद्या राज ला देणार होती.
    येते राज पण मीरा साठी रिंग घेतो जी तो मीरा ला देऊन पुन्हा एकदा प्रपोज करणार असतो.उद्या मीरा शी बोलून तो घरचा ना पण मीरा ला भेटायला घेऊन येणार असतो.दुसऱ्या दिवशी राज ते फिरायला जातात. तो आपल्या गावा पासून खूप दूर गेले असता. राज आपली बाईक एका एकांत ठिकाणी थाबतो. ती कडे सगळी कडे हिरवे रान असते हळुवार वाऱ्यची झुळूक येत होती सगळीकडे काकसे मस्त वाटत होते. तो मीरा कडे पाहतो तिचे केस वाऱ्याने उडत जोते ती ते ठीक करत होती ती आज साडीत खूप छान वाटत होती.तिच्याकडे पाहत बसावे वाटत होते. तो वर मीरा चे लक्ष जाते. ती थोडं लाजते. राज आपल्या एका पायावर उभा राहतो आणि मीरा ला म्हणतो. "मीरा मला तुझी साथ या जल्मीनव्हे तर पुढची सात जलम तुझ्या सोबत राहायचे आहे. तुझ्या सोबत मलासुख दुःख शेहर करायची आहेत. आयुष्यात कधीच तूझ्या डोळ्यात पाणी येऊ दयाचे नाही आहे. माझं खूप म्हणजे खूप प्रेम आहे. तूझ्या शिवाय एक दिवस पण नाही जात माझा. आय लव्ह यू डिअर." मीरा त्याचाकडे पाहते. त्याचा डोळ्यात एक आपु लकी एक होती, मीरा पण आय लव्ह यू टू म्हणते. आणि त्याला मिठीत घेते. थोडा वेळ ते बाजूचे सगळे जग विसरून गेले होते. तोवर पाऊस सुरु होते. मीरा आणि राज समोर एक छोट घर असते तिकडे जातात तर तिकडे जाऊन उभा राहतात. आत मध्ये आवाज दिला तर कोणीच नसते. मीरा राज पूर्ण भिजली होती. मीरा कडे पहिले तर तर राज पाहत बसला, ती साडी तिचा अंगाला पूर्ण चिकटून बसली होती. त्याला न राहून तिचा जवळ जाऊ वाटत होते. तोवर एक्दम वीज जोरात होते. काही तरी पडले आसा मोठयाने आवाज होतो मीरा घाबरते आणि राज ला मिठी मारते. राज चा अचानक जवळ गेल्यावर त्यालाच करंट आल्यावणी होतो. तो पण तिला जवळ घेतो. ते दोघे खूपच जवळ येतात ते एवढे जवळ येतात की त्याचे त्यानाच लाज वाटू लागते.थोडा वेळाने ते भानावर येतात मीरा ला खूप वाईट वाटत आपण खूप चुकीचं वागलं यामुळे तिला खूपच वाईट वाटत होते. ती राज ला घरी जाऊया म्हणते. राज ला आपण चुकीचं वागलोय याचा वाईट वाटते. राज मीरा ला म्हणतो मी उद्या तुझ्या घरी येऊन आपल्या लग्नाचं बोलतो. आणि माझ्या आई वडिलांना पण सांगतो तुझ्याबदल.
    तिला थोडे बर वाटते. ती पण आज घरी राज बदल सगळे सागाचे ठरवते. दोघे ही घरी निघून जातात. राज तिला ड्रॉप करतो आणि निघून जातो. ति घरी येते तर कोणीच घरी नसते. ती आपल्या आई ला कॉल करते. तर आई सांगते तिचा वाडीलायची तबियत ठीक नाही म्हणून हॉस्पिटल मध्ये आहे टू पण तिकडे ये. मीरा पटकन फ्रेश होऊन निघून जाते. तिचे 'पपा ICU मध्ये आता आई कडून समजते की त्याना कॅन्सर आहे जगण्याचे चान्स खूप कमी आहे त्याचकडे जास्त दिवस नाही. मीरा रडू लागते. तिला चकर आल्यासारखं वाटते. ती खाली बसते. तिची आई तिला सावरते. तीच आई कडे लक्ष जाते त्याचे रडून डोळे सुजले होते. मीरा स्वतः सावरते आई ला जवळ घेते. आई पण तिची खूप रडत होती. Dr बाहेर येतात व सांगतात की त्याना तुमाला आत बोलवले आहे. मीरा आणि आई आत मध्ये निघून जातात. वडिल शुद्धदिवर आले होते हळू आवाजात मीरा ला जवळ बोलवतात मीरा रडू कंट्रोल होत नाही ती रडू लागते ते तिला शांत करतात. व सांगतात माझी मारायच्या आधी एक इच्छा आहे मीरा च लग्न पाहून मारायचे. मीरा राज बदल सांगणार तोवर ते बाहेर हात करतात. मीरा पाहते. एक हँडसम उंच गोरा बॉडी तेन त्याचा उंचीला एकदम मॅच होत होती असा मुलगा आत मध्ये येतो. तिचे वडील म्हणतात हा आकाश माझ्या सोबत काम करत होता इन्स्पेक्टर आहे. माझ्या मित्राचा मुलगा खूप हुशार आहे. माझी इच्छा आहे की तुमचा दोघच लग्न झाले पाहिजे म्हणेज मी मारायला मोकळा. मीरा त्याना गप्प बसायला सांगते. तिला काय बोलवे तेच समजत नव्हते ती आपल्या वडिलांना म्हणते तुमी बरे व्हा मग लग्नचे बगु पण ते म्हणतात माझ्याकडे जास्त टाइम नाही आहे उद्या च लग्न करू. तीच काय ऐकून न घेता ते आकाश ला विचारतात तुला चालत असेल तर आपण उद्या च उद्या लगाम करून टाकू. आकाश ने मीरा ला फोटो मध्ये पहिले होते तिला ती खूप आवडली होति. तो म्हणतो तुमची जी इच्छा असेल ति तिचे वडील म्हतात मला घरी घेऊन चला. येते राहून पण काय मी बरा होणार नाही. Dr जायला परमिशन देतात. सगळे घरी येतात मीरा आपल्या रूम मध्ये जाते दरवाजा लावून घेते. व खूप रडायला लागते तिला तिला सगळी कडे अंधार दिसत होता. एक सुद्धा मार्ग नव्हता. ति राज शिवाय जगण्याचा विचार पण करू शकत नव्हती. आणि वडिलांची लास्ट इच्छा पूर्ण पण करू शकत नव्हती तिला खूप रडू येत होत. ति रडून शांत होते व विचार करते राज ला माझ्या पेक्षा खूप चांगली मुलगी भेटेल पण वडिलांची इच्छा पूर्ण केली नाही म्हूणन आयुष्यभर दोष देत राहील मी त्याचा साठी मी एवढे नकीच करू शकते. पण नवऱ्यची जागा राज सोडून कोणालाच नाही देऊ शकत. आयुष्यभर राज वर प्रेम करेन. ति जागा फक्त त्याची असेल. ति राज ला कॉल करते व सांगते, "राज सॉरी पण मी उद्या लग्न करत आहे मुलगा खूप श्रीमंत आहे इनक्पेक्टर आहे.. आयुष्यात पैसा शिवाय काहीच येत नाही नुसतं प्रेमाने पोट नाही भरत मला खूप लेट समजले मला माफ कर मला विसरून जा. "राज म्हणतो मीरा मला थोडा वेळ दे मी पण खूप पैसे मिळवेन ग फक्त्त तुझी सोबत असू दे. प्लीज मला सोडून नको जाऊ मी भेटायला येतो. मीरा म्हणते. तुला माझी शपत आहे तू मला कधीच भेटायला येऊ नको. फोन पण नको करू म्हणून फोन ठेऊन देते खूप रडते. राज पुन्हा कॉल करतो पण ति काय उचलत नाही मीरा सिम कार्ड काडून टाकते. आणि लग्नाला तयार होते...
    खरंच प्रेमात खूप येत नसतात... जर आपले आवडते व्यक्ती भेटली तर खरंच खूप चांगला असतो... आणि जर नाही भेटली तर आयुष्य म्हणजे पूर्ण नरक असत..
    मीरा खरंतर मनापासून त्याच्यावर प्रेम करू लागली होती...
    पण अचानक सगळं काही बदललं होतं... राजला आठवण तिच्या डोळ्यात ले अश्रू थांबता थांबत नव्हते....
    कितीतरी स्वप्न तिने पाहिली होती त्याच्यासोबत... आणि त्याला सगळे देऊनही टाकलं होतं तिने..
    कारण तिने मनाने पहिल्यापासूनच त्याला आपला नवरा मानलं होतं..
    राज शिवाय ती जगू शकत नव्हती...
    पण आता सगळं संपलं होतं..... आता वडील सांगतील त्याच मुलाशी लग्न करावे लागणार होतं..
    ती रात्र काय तिला झोप लागतच नाही.. सारखा आपली कुस बदलत होती...
    डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं...
    ती मनात म्हणते वडिलांची तब्येत ठीक असती तर मी काहीतरी करू शकले असते...
    पण आता मी काहीच करू शकत नाही याचं दुःख तिला खूप झालं होतं...

  • 3. प्रेम यातना - Chapter 3

    Words: 2168

    Estimated Reading Time: 14 min

    दुसऱ्या दिवशी मीराच्या लग्नाची तयारी झाली. जास्त  लोकांना काही बोलवले नव्हते घरचेच होते आई-वडील आकाशचे आणि मीराच्या आई-वडील आणि एक दोन ओळखीचे  होते. मीरा आपल्याला रूममध्ये होती. कालपासून रडून तिचे डोळे सुजले होते आणि तिच्या आई तिच्याजवळ जाते त्यांना वाटते की ती त्यांना सोडून दूर जाणार आणि त्यांच्या वडिलांना कॅन्सर  आहे म्हणून ती  रडली असेल. आई  मीरा जवळ जाते. तिला जवळ घेते. मीराच्या आईलाही खूप वाईट वाटते तिला त्यांना एकतर तिच्या वडिलांना कॅन्सर आहे म्हणून खूप दुःख झाले असते आणि त्यात आणि आपल्या मुलीला एवढ्या लवकर लग्न करून जावे लागते याचं दुःख खूप होतं त्यांना. त्यांनी मिराला मिठी मारली आणि खूप रडू लागल्या. मीराच्या डोळ्यातून आता पाणी वाहण्याची कमी झाले होते तिने आपल्या मनाला पक्क केले होते की आता काही करून आपल्या आयुष्यात राज  साठी काही जागा नाही.तिने आपल्या आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतला असतो. ती आपल्या आईचे डोळे पुसते आणि रडू नको म्हणते व बाबा लवकर ठीक होतील असेही म्हणते.तिची  आई तिला आवरला सांगून साडी देऊन तिथून निघून जाते. मीरा फ्रेश होते साडी घालते गजरा घालते. सिम्पल मेकअप करून आरशासमोर उभी राहते. तिला या लग्नाच्या साडी मध्ये राज पाहायला  पाहिजे असं वाटत होतं. मीराला राज ची बायको म्हणून तयार व्हायला खूप आवडले असते...तर तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं.  ती स्वतःला सावरते तर तिच्या आईचा आवाज येतो" आवरले का ग मीरा", चल मी तुला न्यायला आले आहे.आणि तिच्या आई मीराला घेऊन बाहेर जाते बाहेर आकाश आणि तिच्या आई-वडील तयार होऊन आले असतात. आकाच्या आई-वडिलांनी मीरा ला फोटोमध्येच पाहिले असते आज जेव्हा तिला पाहिले होते नवरीच्या रूपात तर त्यांना ती खूप आवडली होती.आकाश तरी तिच्याकडे बघतच राहिला होता. ती  आज खरच सिम्पल पण खूप छान दिसत होते तिचे वडील चेअर वर बसले होते ते आपल्या मुलीकडे पाहत होते त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात त्यांना तीच लग्न  खूप मोठ्याने आणि धुमधडाक्यात करायचे असते पण तसेच त्यांना करता आले नाही त्यांना खूप वाईट वाटतं . मीरा त्यांच्याजवळ जाते त्यांच्या डोळ्यात अश्रू  असतात. त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसून टाकते. म्हणते तुम्हाला आता लवकर बरे व्हायचं आहे आणि जाऊन लग्नाच्या पाठावर बसते ती थोडं सुद्धा आकाश कडे पाहत नाही आकाश तिच्याकडे पाहत असतो. आकाशने पण कुर्ता सेट घातला असतोआणि छान नवऱ्याच्या रूपात तो आला असतो. तो पण खूप  हँडसम दिसत होता.पण मीरा  एकदा सुद्धा त्याच्याकडे पहात  नाही. मिरा च्या मनात  नवऱ्यासाठी एकाची जागा होती आणि ती म्हणजे राज ची होती 
     तिकडे राज अवस्था खूप बेकार झालेले असते तो रात्रभर झोपला नसतो त्याला वाटत असतं की मीरा त्याची मस्करी करत आहे. तो सारखं फोन ट्राय करत होता पण तिचा काही फोन लागत नव्हता. तो खूप निराश झाला होता आणि मीराने  त्याला शपथ पण घातले असते की त्याच्या घरी पण यायचं नाही. राजला आता पक्क समजलं होतं की मी राहता त्याला कधीच भेटणार नाही. तो आपल्या रूम मध्ये एकटाच बसला होता आणि आपल्या मोबाईल मध्ये मीराचा फोटो पाहत होता. तिला मीराच्या बोलण्याचा खूप राग आला होता. आपण मिराला ओळखायला चुकलो असेच त्याला वाटत होते. तो खूप रडत असतो. आयुष्यात त्यांना पहिल्यांदाच मीरावर प्रेम केलं असतं. 
      तिकडे मिरा च लग्न घरच्या घरी पूर्ण होतं आणि मीरा आपल्या सासरी निघून जाते. मीराचा आपल्या घरात पहिला दिवस असतो. घरातली सर्व कार्यक्रम होऊन त्याना आराम करण्यासाठी तिच्या रूम मध्ये जायला सांगतात.आकाश तिला आपल्या रूममध्ये घेऊन सोडून निघून जातो.आकाश चि रूम छान पैकी  डेकोरेट  केलेली असते. लग्नाची पहिली रात्र म्हणल्यावर सगळीकडे फुलांनी वगैरे सजवलेले असतात. मीरा ते सगळं पाहते आणि पूर्ण घाबरून जाते ती मनातून खूप घाबरलेले असते. तिने  आकाशी लग्न जरी केला असले तरी मनाने ते आजही राज चि होती. थोड्या वेळाने आकाश आपल्या रूममध्ये येतो. मीरा मात्र तशीच एकीकडे डोळे लावून पाहत बसली असते. आकाश तिच्याजवळ जातो. तिच्या अगदी जवळ साईडला बसतो व तिला म्हणतो मीरा मला माहित आहे तूला माझ्याविषयी जास्त माहित नाही आणि आपल्या दोघांची जास्त ओळखही नाही आपलं लग्न खूप गडबडीत झाले आहे. आणि तू आता तुझ्या वडिलांच्या कॅन्सर मुळे त्यांच्या टेन्शनमध्ये आहेस मला माहित आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस जोपर्यंत आपल्या दोघांची फ्रेंडशिप चांगली होत नाही आपण एकमेकांना दोघे चांगले ओळखत नाही तोपर्यंत मी तुला हातही लावणार नाही. त्यामुळे तू काही घाबरू नको तू फ्रेश हो साडी चेंज कर आणि झोपायला ये. तू बेडवर वरती झोप मी खाली झोपेन. मीराला थोडं बरं वाटतं. ती काही न बोलता उठते व बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला जाते. ते फ्रेश होऊन येऊन बेडवर खाली आपल्या अंग टाकते. काल रात्रीच्या जागरणीमुळे आणि दिवसभरच्या दिवसभरच्या धावपळीतील खूप थकलेले असते तिला पडल्या पडल्या झोप लागते.
     तिकडे राज मीराच्या घरी जातो. हिम्मत करून तो बेल वाजवतो. मीराच्या आई बाहेर येतात ." कोण,आपण तुम्हाला कोण पाहिजे."? राज म्हणतो की मीरा चा क्लासमेंट आहे आणि मीराकडे माझ्या काही नोट्स आहेत त्या घेण्यासाठी आलो आहे. मीराच्या आई त्याला सांगते की. मीरा ची आई त्याला सांगते की मीरा च काल लग्न झाल्ले आहे आणि ती तिच्या सासरी गेली आहे. एवढेच ऐकल्याव राज तिथुन निघून जातो. राजचा मनात मीरा  विषयीचा राग आणखी वाढतो. राज रडत रडत जात असतो राजांच्या डोळ्यातून खूप पाणी वाहत असते.त्यालावरून पाऊस लागतोय याची जरा सुद्धा भान नसते.  त्यानंतर तो चालत रोडवर येतो.रोड वरून जाताना त्याला गाड्यांच जरा सुद्धा भान नसते.  अचानक समोरून एक गाडी येऊन त्याला धडकणार तोवर त्याला कोणीतरी धक्का देतो. तो जमिनीवर पडतो. तो वर पाहतो तर त्याचे वडील आले असतात.ते राजवर ओरडतात ते म्हणतात", तू पाहत कुठे होतास, आज जर तुला काही झाले असते तर काय झालं असतं आमचं. तुला काही कल्पना आहे का? तुझ्याशिवाय मी कसं जगलो असतो. मागच्या वेळी जेव्हा तुझा एक्सीडेंट झाला होता तेव्हा पूर्ण घर गहाण ठेवून तुझा हॉस्पिटलचा खर्च केला होता पण आज जर जेव्हा तुला काही झालं असते तर आम्ही काय केलं असते. आता तुला काही झाले असते तर हॉस्पिटल साठी आपल्याकडे काहीच पैसे नाहीत. अन तुला असं मारताना नाही आम्ही पाहू शकलो. तुझ्या आधी तू आम्हाला मारून टाक आणि मग जीव दे. त्यांना खूप रडू येतं ते म्हणतात मला माहित नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे पण आमच्या तिघांचा आयुष्य तुझ्यावरच अवलंबून आहे. माझे एकच स्वप्न आहे की तुला आयपीएस झालेला पाहायचा आहे. प्लीज राज. तू जागा हो आणि तुझं स्वप्न पूर्ण कर. आयुष्यात जे तुला पाहिजे ते मिळत जाईल पण थोडा वेळ दे. आयुष्यात एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून आपण जीव देणार हा पर्याय नाही होत त्यावर. अशी कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे हात पाय नाहीत कितीतरी गोष्टी नाहीत पण ते सुद्धा आज जगत आहेत त्यांनाही खूप जगण्याची इच्छा आहे. तुझ्याकडे तर देवाने सगळेच दिले आहे. त्याचा उपयोग कर.आयुष्यात काहीतरी बन आई वडिलांसाठी देशासाठी काहीतरी कर.आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल.आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून त्याच्या दुःख मानत बसण्यापेक्षा आपल्याकडे आहे जे आहे त्याचा आनंद मानून कष्ट करत रहा. मग तू आयुष्यभर सुखी राहशील. राज ला खूप रडू येते.तो आपल्या वडिलांची माफी मागतो. त्याला समजते की, आपण जी मुलगी  आपल्याला चार दिवस भेटली तिच्यासाठी जीव दयाला जात होतो. ज्या आई-वडिलांनी आपल्याला आयुष्यभर लहानपणापासून मोठे केले त्यांचा एकदाही मी विचार केला नाही.त्याला त्याची लाज वाटू लागते तो विचार करतो काही झाले.तरी आपण आपले आयुष्य आपला आई-वडिलांसाठी जगायचं त्यांची स्वप्न पूर्ण  करायची आहेत. त्यांना जे हवं ते सगळं आणून द्यायचं. खूप पैसा कमवायचा इतकं मोठं व्हायचंय की मीराला एकदा वाटलं पाहिजे की आपण राजला रिजेक्ट करून खूप मोठी चूक केली.तो मनाशी पक्क करतो काही झाले तरी त्याला आता आपल्या आयुष्यात खूप पुढे जायचे आहे.
    मीराच्या लग्नाला आता एक महिना होऊन गेला होता. आकाच्या घरी ती आता रमली होती. मीरा च लग्न झाल्यावर लगेचच एक महिन्याने तिच्या वडिलांचा देहांत झाला . माहेरी ती दोन दिवस राहिली आणि आपल्या घरी निघून आली होती त्यानंतर पुन्हा कधी आपल्या घरी गेली नाही. तिच्या वडिलांच्या आठवणी त्या घरी असल्यामुळे तिला त्या घरी करमतच नव्हते. आकाची आई वडील हि मीरावर खूप जीव लावायचे आणि मीरारा ही तशीच होती. ती आपल्या आई-वडिलांप्रमाणे त्यांच्यावर खूप जीव लावायची. मीरा तशी हुशारच होती त्यामुळे घरकाम आणि आकाच्या आई वडिलांची खूप काळजी घ्यायची. त्यामुळे आकाशला खूप मीरा बद्दल अभिमान वाटायचा. मीरा आणि आकाश लग्न झालं असल्या तरी नवरा बायको म्हणून आकाश आणि मीरा खूपच लांब होते त्यांनी आजपर्यंत एकमेकांना कधीच हात लावला नव्हता.ते एक चांगले मित्र म्हणूनच होते. आणि सगळ्या घराला वाटत होतं की, ते दोघे एकमेकांसोबत खूप खुश आहेत. आकाश पण मीरावर आता प्रेम करू लागला होता. मीरा होतीस तशी दिसायला सुंदर सुस्वभावी संस्कारी सगळ्यांमध्ये  मिळून राहणारी. आकाश मनापासून तिच्यावर प्रेम करू लागला होता अखेर ति लग्नाची बायको तर होतीच. म्हणून आकाश ठरवतोय की आता तिला आपण आपल्या मनातलं सांगून टाकायचं आणि आपल्या नात्याला आता पुढचा प्रवास चालू करायचा.म्हणूनच आकाश ने आज ठरवले होते की आज आपण मिराला प्रपोज करायचा आणि तिच्यासोबत नवरा बायकोचा नाते पुढे घेऊन जायचे.

      आकाश आज येताना मीरासाठी  छान पैकी गजरा आणि खूपच सुंदर अशी साडी घेऊन येतो. तो घरी येतो त्याच्या आई वडीला दोन चार दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. मीरा आज एकटीच होती. तो आत मध्ये गेला तर मीरा किचनमध्ये काहीतरी करत होते पाहिले आणि आपल्या रूममध्ये गेला त्यांनी छान पैकी आपली रूम डेकोरेट केली. घेऊन आपल्या रूम मध्ये जातो. मीरा रूममध्ये आली ती सगळ पाहते तिला थोडे वेगळेच वाटतं, आकाश तिला म्हणतो तू ही साडी घालू ये . मीरा जास्त काही न विचारता साडी नेसून बाहेर येते. तर तिला गजरा तिच्या केसांमध्ये घालण्यासाठी देतो. आकाश म्हणतो मी घालू काय गजरा केसात तुझ्या, मीरा पण काही न बोलता हो म्हणते. आकाश तिला गजरा घालतो,मग आकाश  आणलेला गुलाब घेतो  मीराला म्हणतो, तो एका पायावर खाली बसतो व म्हणतो "मीरा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता आपण एकमेकांना ओळखतो. त्यामुळे मला वाटते की आपण आपलं नातं मैत्रीच्या पुढे नेले पाहिजे, मीरा खरंच माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, मीराला काय बोलावे ते सुचत नाही तिला खूप घाम येत असतो तिच्या मनाची घालमेल  वाढत चालली होती तिला राज सोडून दुसरा कोणाचा विचारही करू शकत नव्हती,, तिला हो म्हणता येत नव्हता नाही म्हणता येत नव्हतं. तिला खूप घाम आलेला असतो आणि अचानक तिला चक्कर येथे  खाली पडते. आकाशला काही समजत नाही, तो ओरडत असतो मीरा मीरा काय झालं तुला, तो मीरा ला उचलतो आणि पटकन गाडीमध्ये घालून हॉस्पिटलला घेऊन जातो, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते त्यांच्या ओळखीचेच होते, डॉक्टर तिला चेक करतात, आणि आकाशला म्हणतात काँग्रॅच्युलेशन आकाश तुम्ही दोघे आई-वडील होणार आहात, आकाशला मोठा शॉक लागतो, त्यांच्या दोघांमध्ये आजपर्यंत असं काही झालं नव्हतं, ते दोघे मैत्रीच्या पुढे कधी गेलेच नव्हते, त्याला काय बोलावं काही सुचत नव्हतं, डॉक्टर त्याला, आवाज देत राहतात, तेव्हा वा तो भानावर येतो आणि हसून हा म्हणून शांत बसतो, डॉक्टर सांगतात आता दर महिन्याला रेगुलर चेक अप साठी या, काही औषध गोळ्या देऊन जायला सांगतात. मीरा आकाश सोबत नजर मिळू शकत नव्हती. तिला आठवते की ती राज फिरायला गेले असताना त्या दोघांमध्ये जे झालं होतं त्यामुळे ती प्रेग्नेंट होती म्हणजे हे बाळ राज होते तिला माहिती होतं  आणि, ती आकाशला काय सांगणार याचाच वेळ टेन्शनमध्ये होती.

     आकाश मिराला न सांगताच फास्ट चालत आपल्या गाडीमधून निघून जातो. तो पाहतच नाही मीरा गाडीमध्ये बसली आहे की नाही, मीरालाही अपेक्षित होतं तिला माहिती होतं आपली चूक आहे, ती ऑटो घेते आणि त्याच्या मागे निघून जाते, आकाश घरी येतो आणि आपल्या रूममध्ये जाऊन त्याने केलेले डेकोरेशन वगैरे सगळं मोडून टाकतो. त्याला मीराचा राग खूप आलेला असतो. त्याला खूप वाईट वाटले असते त्यांनी मीरा विषयी असा कधीच विचार केला नव्हता, कारण तो मीरा वर खूप मनापासून प्रेम करत असतो. त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मीरा त्याच्यासोबत  असे वागेल. तो एवढा मोठा इन्स्पेक्टर होता पण त्याच्या डोळ्यातून खूप पाणी वाहत होते,

      थोड्याच वेळात मीरा ही आपल्या घरी येते, ती आपल्या रूममध्ये निघून जाते, ती पाहते तर काय आकाशने सगळी रूम अस्ताव्यस्त  केलेली असते. आणि आकाश एका कोपऱ्यात खूप रडत असतो. ती हिम्मत करून आत मध्ये जाते, आणि आकाशला म्हणते, आकाश, मीरा "काही बोलताच आकाशला शांत राहायला सांगतो, तो म्हणतो तुझ्या तोंडातून माझं नाव कधीच घेऊ नको कोणाचे पाप घेऊन फिरत आहेस तुझ्याकडून मी अशा अपेक्षा केली नव्हती, मग का लग्न केलीस माझ्याशी तू का माझा आयुष्य बरबाद केलीस, मीरा म्हणते, मला खरंच तुम्हाला धोका द्यायचा नव्हता. पण परिस्थितीचा अशी होती की मला काहीच करता आलं नाही, मला माफ करा, ती रडू लागते तुझ्या डोळयातून खूप पाणी येत होते. पण आज आकाश काहीच बोलत नाही, नाहीतर इतर दिवशी तिला जरा होळी रडू दिले नसते. मीरा आकाश ला सांगू लागते "कॉलेजला असताना माझे का मुलगा प्रेम होतं, आणि अनाविकपणे आमच्या मध्ये एक चूक झाली, आम्ही दोघं लग्न करणार होतो आणि त्या दिवशी मी घरी येऊन आई-वडिलांना सांगणार होतो की माझा राजवर खूप प्रेम आहे", मी घरी आले तर पाहते तर काय वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले होते आणि त्या आयसीयू मध्ये होते, मी या राज बद्दल काही सांगणार त्या आधीच त्यांनी माझं लग्न तुमच्याशी ठरवलं होतं,पण माझं मनापासून राज वर प्रेम होतं, आम्ही दोघे लग्न करणार होतो, वडिलांचे लास्ट इच्छा होते की माझं लग्न तुमच्याशी व्हावं, मला खरंच तुमचं आयुष्य नाही हो खराब करायचं होतं, मला खरंच मनापासून माफ करा, आजही माझं खूप राजवर प्रेम आहे मी राज सोडून दुसरा कधीच कुणावर प्रेम नाही करू शकत, म्हणूनच मी हे घर सोडून जात आहे. तुम्ही खरच खूप चांगले आहात. मला माझ्यापेक्षाही खूप सुंदर आणि चांगली मुलगी भेटेल जी फक्त तुमच्यावर प्रेम करेल, आपण दोघे जरी आयुष्यभर एकत्र राहिलो तरी मी कायम राजवर रच प्रेम करत राहील.म्हणून मी हे घर सोडून जात आहे. मीरा म्हणते आणि बॅग भरू लागते. आकाश थोडा वेळ काहीच बोलत नाही. त्याला काय बोलायचे हेच समजतं नाही. ती आकाश ला म्हणते. काळजि घा तुमची आणि आई बाबाची, आई बाबा ना माझ्या कडून सॉरी सांगा, आणि रडू लागते. ती निघतच असते. आकाश तिला म्हणतो, तू एकदा तूझ्या वडिलांचा विश्वासात घेऊन का नाही सांगिलीस, मला का नाही सांगितलेस, तुझा आणि तुझ्या वडिलांचा विचार केलास माझं काय, माझ्या आई बाबा च काय आमची काय चुकी होती का केलास माझाशी लग्न, सॉरी म्हणून माझे आयुष्य पूर्वी सारखं होणार आहे काय "बोल मीरा....